• Fri. Jun 20th, 2025

शामगीर महाविद्यायालयाला नॅकचे ‘बी’ मानांकन 

Byjantaadmin

Oct 20, 2023
शामगीर महाविद्यायालयाला नॅकचे ‘बी’ मानांकन
श्री. शामगीर शिक्षण संस्थेच्या शामगीर महाविद्यालयास राष्ट्रीय मूल्यांकन
निलंगा-  शामगीर महाविद्यायालयाला नॅकचे ‘बी’ मानांकन  श्री. शामगीर शिक्षण संस्थेच्या शामगीर महाविद्यालयास राष्ट्रीय मूल्यांकन तसेच प्रत्यायन परिषदेची (नॅक) B श्रेणीसह २.३४ गुण मिळाले आहेत. पहिल्या सायकल मध्ये ही श्रेणी प्राप्त करणारे विद्यापीठ परिक्षेत्रामधील कायम विनाअनुदानित पहिले महाविद्यालय ठरल्याची माहिती संस्थेचे कार्याध्यक्ष श्री. वसंतराव पाटील यांनी पत्रकार परिषेदत दिली.
यामुळे विद्यार्थ्यांना महाविद्यालयातून बी.ए / बी.कॉम / बी.एस्सी या उच्च शिक्षणासाठी अधिक फायदा होणार आहे. असेही पाटील यांनी सांगितले.
श्री. शामगीर शिक्षण संस्था कार्याध्यक्ष श्री. वसंतराव पाटील म्हणाले नॅकच्या माध्यमातून देशपातळीवर उच्च शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयांची गुणवत्ता (मुल्यमापन) तपासली जाते. माजी कुलगुरु सतिश चंद्र (दिल्ली), डॉ. वेदामुर्ती ( बेंगलोर), डॉ. कनिधी श्रीरामुलू (विशाखापट्टणम) या नॅक च्या तज्ञ समितीने दिनांक ०९ व १० ऑक्टोबर रोजी दापका येथील शामगीर महाविद्यालयास भेट देऊन गेल्या पाच वर्षाची महाविद्यालयाची शैक्षणिक प्रगती व गुणवत्तेची पाहणी केली होती. त्यानंतर नॅकने नुकतेच गुणांकन जाहीर केले. त्यात महाविद्यालयास पहिल्याच सायकल मध्ये B हा ग्रेड मिळाला असून महाविद्यालयाचा CGPA २.३४ एवढा आला आहे. या मानांकनामुळे आणि नॅक दर्जाप्राप्त महाविद्यालय असल्याने विद्यार्थ्यांना करिअर आणि उच्च शिक्षणासाठी फायदा होईल, असे प्राचार्य रोशनकुमार भिंगानिया यांनी सांगितले.
शामगीर महाविद्यालयाने नॅक B श्रेणी प्राप्त केल्याने आता महाविद्यालयास विविध प्रकारचे नविन कोर्सेसही सुरु करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महाविद्यालयातील अभ्यासक्रम अध्यापन मुल्यांकन, संशोधन, विस्तारकार्य, मुलभूत सुविधा व विद्यार्थ्यांसाहय व प्रगती प्रशासकीय नेतृत्व व व्यवस्थापन, संस्थात्मक मुल्य व नावीन्यपूर्ण उपक्रम आदींची पाहणी करुन नॅक समितीने हा दर्जा बहाल केला आहे. महाविद्यालयास ४ पैकी २.३४ गुण मिळाल्याल्याचे संस्था कार्याध्यक्ष श्री. वसंतराव पाटील यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *