• Fri. Jun 20th, 2025

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जनसंवाद यात्रेस उस्फूर्त प्रतिसाद

Byjantaadmin

Oct 20, 2023

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जनसंवाद यात्रेस उस्फूर्त प्रतिसाद
लातूर-महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे काढण्यात आलेली दुसर्‍या टप्प्याची जादुटोणा विरोधी कायदा जनसंवाद यात्रा दिनांक 19/10 लातुर व 20/10 /2023 अहमदपुर लातूर जिल्ह्यात आली होती. या दोन दिवसात जादुटोणा विरोधी कायदा जनजागरण व संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.राज्यव्यापी जादूटोणा विरोधी कायदा जनसंवाद साधत देशी केंद्र माध्यमिक विद्यालय या ठिकाणी मुख्याध्यापक सगर आर .टी .व स्वामी शिवानंद सर, महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात प्राचार्य डॉक्टर कॅप्टन बाळासाहेब गोडबोले,दयानंद विधी महाविद्यालयात प्राचार्य नाथाने पी पी मॅडम व प्राध्यापक उमेश काटेकर, दयानंद कला महाविद्यालयात प्राचार्य डॉक्टर शिवाजी पी. गायकवाड व डॉक्टर संतोष पाटील व पोलीस अधिक्षक कार्यालयात पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक व पोलीस अंमलदार
यांच्यासोबत संवाद साधला.पोलीस अधीक्षक कार्यालयातील कार्यक्रमास माननीय श्री सोमय्या मुंडे पोलीस अधीक्षक माननीय श्री अजय देवरे डिशनल पोलीस अधीक्षक यांनी पुढाकार घेतला व संजीवन मिरकले पोलीस निरीक्षक यांनी कार्यक्रम यशस्वी केला . अहमदपुर येथे महात्मा गांधी म.वि. यशवंत मा.वि. ज्ञानदीप अकादमी येथे हे सर्व कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता यात्रेसोबतचे नंदिनी जाधव पुणे ,भगवान रणदिवे सातारा, पवार अनंत दापोली यांच्यासह अनेक कार्यकर्ते होते प्रा.डा.कप्पटन बाळासाहेब गोडबोलेप्रकाश घादगिने राज्य कार्यकारी समिती सदस्य वसंत टेकाळे राज्य वैज्ञानिक जाणीवा प्रकल्प, पंकज जयस्वाल शहर कार्याध्यक्ष ,प्राध्यापक एम .बी. पठाण प्रधान सचिव ,अ‍ॅड.उदय दाभाडे ,किशोर जैन .नरसिंग इंगळे अहमदपुर मेघराज गायकवाड ,डॉ.धिरज देशमुख उध्धव ईपर प्रा. रत्नाकर नळेगावकर अजहर बागवान चंद्रशेखर भालेराव यांनी खूप परिश्रम घेतले व कार्यक्रम यशस्वी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *