• Fri. Jun 20th, 2025

जागृती शुगरच्या १२व्या गळीत हंगामाचा कृष्णा बँकेचे चेअरमन डॉ अतुलबाबा भोसले सौ गौरवीताई अतूल भोसले यांच्या हस्ते रविवारी  होणार शानदार शुभारंभ

Byjantaadmin

Oct 20, 2023
जागृती शुगरच्या १२व्या गळीत हंगामाचा कृष्णा बँकेचे चेअरमन डॉ अतुलबाबा भोसले सौ गौरवीताई अतूल भोसले यांच्या हस्ते रविवारी  होणार शानदार शुभारंभ
लातूर दि. २०. राज्याच्या खाजगी साखर कारखानदारीत नावलौकिक मिळवलेल्या व शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडवून आणलेल्या देवणी तालुक्यातील तळेगाव येथील जागृती शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज लिमिटेड च्या १२ व्या बॉयलर अग्निप्रदिपन व गळीत हंगामाचा शुभारंभ २२ ऑक्टोंबर रोजी रविवारी सकाळी ११ वाजता राज्याचे माजी मंत्री कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष दिलीपराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत कृष्णा बँकेचे चेअरमन डॉ अतुलबाबा भोसले व त्यांच्या सुविध्य पत्नी व जागृती शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज लिमिटेड च्या चेअरमन सौ गौरवी अतुलबाबा भोसले यांच्या शुभ हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे माजी वैद्यकिय शिक्षण मंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख हे राहणार आहेत तर प्रमूख अतिथी म्हणून आमदार तथा जिल्हा बँकेचे चेअरमन धीरज विलासराव देशमुख,जिल्हा बँकेचे संचालक अशोकराव पाटील निलंगेकर यांची उपस्थिती राहणार आहे
या भव्य दिव्य जागृती शुगरच्या २०२३-२४ च्या बॉयलर अग्नी प्रदीपन व गळीत हंगाम शुभारंभ सोहळ्यास कार्यक्षेत्रातील  उस उत्पादक शेतकरी, सभासद, हितचिंतक, नागरिक यांनी उपस्थित राहावे असे आवाहन जागृती शुगर चे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे,संचालक दिलीपराव माने,संचालक सूर्यकांत करवा जनरल मॅनेजर गणेश येवले यांनी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *