• Wed. May 27th, 2026

मोदींच्या हॅटट्रिकसाठी आता फ्रेंड्स ऑफ बीजेपी अभियान; नेमले ४८ लोकसभेत संयोजक

Byjantaadmin

Oct 19, 2023

केंद्रात सत्तेची हॅटट्रिक नोंदविणे या वेळी भाजपला काहीसे कठीण आहे. म्हणून त्यासाठी ते जंगजंग पछाडत आहेत. विरोधी विचारधारेच्या मंडळींनाही सोबत घेतले आहे. २७२ चा जादूई आकडा गाठण्यासाठी घर चलो अभियानासारख्या अनेक मोहिमा त्यांनी सुरू केल्या आहेत. महाराष्ट्रातील ४८ पैकी ४५ पेक्षा अधिक जागा जिंकण्यासाठी विरोधी खासदारांचे मतदारसंघ रडारवर घेतले आहेत. त्यानंतर आता फ्रेंडस ऑफ बीजेपी या आणखी एका अभियानाची भर पडल्याने भाजपच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याची कोणते अभियान घेऊ हाती, अशी काहीशी अवस्था आता झाली आहे.

कुंपणावरील मते खेचण्यासाठी हे नवे अभियान सुरू केल्याला भाजपच्याच एका पदाधिकाऱ्याने दुजोरा दिला. मोठ्या संख्येने मतदार असे आहेत, की ते राजकारणाचे काही घेणे-देणे नाही कुठलाही राजकीय पक्ष वा नेत्याशी ते संबंधित नाहीत. अशांना भाजपचे मित्र करीत त्यांची मते मिळविणे हा या योजनेचा मुख्य हेतू आहे.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि bjp  प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांची ही कल्पना आहे. बावनकुळेंनी या अभियानाचे ४८ लोकसभा मतदारसंघांचे संयोजक आणि सहसंय़ोजक नुकतेच जाहीर केले. यापूर्वी त्यांनी या मतदारसंघाचे तसेच त्यातील विधानसभा मतदारसंघासाठीही प्रचारप्रमुख जाहीर केलेले आहेत.प्रदेश भाजपच्या या फ्रेंड्स ऑफ बीजेपी अभियानाच्या मावळ संयोजकपदी अनुक्रमे प्रमोद देशक, नितीन कांदळगावकर, तर शिरूरला प्रवीण काळभोर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुण्यात जितेंद्र सिंह आणि विक्रांत आर्य, तर बारामतीत विजयकुमार देवकाते यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे. त्यानंतर लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघातसुद्धा या अभियानाचे संयोजक नेमण्यात सुरुवात झाली आहे.मावळमधील पिंपरी आणि चिंचवडच्या या पदावर नंदू ऊर्फ नितीन भोगले आणि रवींद्र प्रभुणे यांना काल नेमण्यात आले. पक्षाचे शहर वरिष्ठ उपाध्यक्ष व प्रवक्ते राजू दुर्गे, सरचिटणीस विलास मडेगिरी, चिंचवड विधानसभा प्रमुख काळुराम बारणे, पिंपरी विधानसभा प्रमुख अमित गोरखे आदी या वेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *