• Fri. Feb 6th, 2026

महाराष्ट्र महाविद्यालयात जागतिक अन्न दिना निमित्त रॅली व व्याख्यानाचे आयोजन

Byjantaadmin

Oct 19, 2023
महाराष्ट्र महाविद्यालयात जागतिक अन्न दिना निमित्त रॅली व व्याख्यानाचे आयोजन
निलंगा –  संयुक्त राष्ट्राच्या अन्न आणि कृषी संघटनेचा स्थापना दिवस हा ‘जागतिक अन्न दिन’ म्हणून साजरा केला जातो. जगात कुपोषणामुळे लाखो बालकांचा जीव जातो, अशी कुपोषणाची समस्या, भूकेचा  प्रश्न निर्माण होऊ नये, जर अशी परिस्थिती निर्माण झालीच तर त्याचा सामना कसा करावा? या संदर्भात जागरूकता निर्माण करण्यासाठी ‘जागतिक अन्न दिन’ साजरा केला जातो या निमित्ताने महाराष्ट्र महाविद्यालयातील *फूड प्रोसेसिंग अँड फूड टेक्नॉलॉजी* या विभागाच्या वतीने निलंगा शहरात जागरूकता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
देशात काही दशकापूर्वी भरडधान्य मुख्य आहाराचा भाग होता. पण पॉलीस धान्यामुळे ही भरडधान्य आहारातून कमी झाली. या भरड धान्याचा जागतिक पातळीवर वापर वाढावा म्हणून अलीकडे भारताने पुढाकार घेतलेला आहे. याबाबत जागरूकता निर्माण व्हावी म्हणून औरंगाबाद येथील अन्न व औषध संचलानालयातील सहायक कमिशनर मा. दयानंद पाटील यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम महाविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला होता. या संपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.माधव कोलपुके यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रा. श्रीनिवास काकडे, प्रा. अभिमन्यू गंगाजी, प्रा. सचिन शिंदे,  प्रा.राजेश जाधव, प्रा. सोनम पाटील यांच्या देखरेखी खाली करण्यात आलेले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *