• Sat. Jun 21st, 2025

निलंगा नगरपरिषेदेने जाहीर लिलाव अखेर रद्द केला

Byjantaadmin

Oct 16, 2023

निलंगा- निलंगा नगरपरिषदेने शहरातील आनंदमुनी चौक,औरंगपुरा मस्जिद,जुनी तहसील कार्यालयासमोरील खुल्या जागेचा भाडेतत्वावर जाहीर लिलाव करून दुकाने थाटण्याचा घाट घातला असताना या भागातील नागरिकांनी एकत्र येऊन शहरात अरुंद रस्ते असलेल्या ठिकाणी अडचण होत असल्याचे लक्षात येताच उपविभागीय अधिकारी कार्यालय निलंगा नगर परिषद प्रशासक याना येऊन निवेदन देऊन सदरील या भागातील परिस्थिती लक्षात आणून दिल्यानंतर उपविभागीय अधिकारी यांनी याची तात्काळ दखल घेऊन लिलाव रद्द केला.औरंगपुरा,निलकंठेश्वर मार्केट,आनंदमुनी चौक,या भागातील प्रतिनिधित्व करीत असलेले माजी नगरसेवक हसन चाऊस ,दयानंद चोपणे म्हणाले की,आनंदमुनी चौक,औरंगपुरा मस्जिद परिसराचे सुशोभीकरण करण्याऐवजी विनाकारण वाद निर्माण करण्याचा प्रयत्न नगरपरिषदच्या वतीने होत असल्याने या ठिकाणी शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या आनंदमुनी चौक विकसित करावा.औरंगपुरा मस्जिद शेजारी असलेली निजामकालीन विहिरीवर सुशोभीकरण करून या परिसरातील रस्ते,नाले,लाइटची सोय करावी अशी मागणी करण्यात आली.यावेळी उपस्थित माजी नगरसेवक हसन चाऊस,माजी नगराध्यक्ष हमीद शेख,तालुकाध्यक्ष विजयकुमार पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.त्याच संबंधाने शहरातील पाणीटंचाई बाबतीत बंद केलेले बोअर तात्काळ चालू करावे,शहरातील दापका वेस मधील गतिरोधक कमी करावे,निलंगा लातूर रोड वरील दुभाजक निंबाळकर पेट्रोलपंपापर्यंत वाढवावे.आदी मागण्याबाबत निवेदन देऊन प्रशासनाने या निवेदनाचा विचार घेऊन सर्व बाबीं लवकरच मार्गी लावूत असे तोंडी आश्वासन मुख्याधिकारी यानी दिले.या निवेदनावर निलंगा विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमोल सोनकांबळे,निलंगा शहर काँग्रेस चे अध्यक्ष अजित नाईकवाडे,गोविंद सुर्यवंशी,खलील तीलगुरे,सद्दाम बागवान,असगर अन्सारी,देवदत्त सुर्यवंशी,इस्माईल बागवान,नदीम सौदागर,इम्रान सय्यद,सिद्दीक बागवान,सलीम अत्तार,एफरोज तीलगुरे,फैसल चाऊस,आवेज शेख,सोहेल शेख,फक्रोदिन शेख,शाहरुख बागवान,शाफिक टेलर,सज्जू बिबराळे,मेहमूद खुरेशी,जुबेर खुरेशी,अफरोज तीलगुरे,भागवत जाधव,इ त्याभागातील नागरीकांच्या सह्याचे निवेदन देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *