• Sat. Jun 21st, 2025

इकडे राहुल नार्वेकरांना झापलं, तिकडे अजित दादांच्या बॅनरवर थोरले पवार झळकले…

Byjantaadmin

Oct 16, 2023

(Deputy CM Ajit Pawar) अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar District) पारनेरच्या (Parner) दौऱ्यावर आहेत. अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते ‘माता मोहटादेवी महिला देवदर्शन यात्रा’ शुभारंभ होणार आहे. यात्रा कार्यक्रमाच्या ठिकाणी जो बॅनर लावण्यात आलेला आहे. त्यावरुन सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. त्या बॅनरवर  (Sharad Pawar)supriya sule आणि अजित पवार यांचा एकत्रित फोटो लावण्यात आला आहे. सध्या पारनेरमधील हा बॅनर चर्चेचा विषय ठरत आहे.

फुलांच्या पायघड्या, रांगोळ्यांचा सडा; पारनेरमध्ये अजित पवारांचं जंगी स्वागत 

उपमुख्यमंत्री अजित पवार आज   ahmadnagar दौऱ्यावर आहेत. अजित पवार यांच्या स्वागताची पारनेरमध्ये जोरदार तयारी करण्यात आली होती. पारनेरच्या हंगा इथं अजित पवारांच आगमन झालं आणि उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये एकच उत्साह संचारला. सर्व कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण होतं. हंगा गावात भव्य रांगोळीच्या माध्यमातून घड्याळाची प्रतिकृती तयार करण्यात आली होती. तसेच, फुलांच्या पायघड्याही घालण्यात आल्या होत्या.

विधानसभा अध्यक्षांवर गंभीर शब्दांत सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे 

आमदार अपात्रता दिरंगाई प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात पार पडलेल्या सुनावणी दरम्यान सरन्यायाधीशांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या कार्यपद्धतीवर अत्यंत गंभीर शब्दांत ताशेरी ओढले. अध्यक्षांचं वेळापत्रक आम्हाला अजिबात मान्य नाही, असं म्हणत सरन्यायाधीश विधानसभा अध्यक्ष आणि त्यांच्या कार्यपद्धतीबाबत प्रचंड नाराज झाले होते. फक्त वेळकाढूपणाचं धोरण अध्यक्ष राबवत असल्याचं प्रथमदर्शनी दिसत आहे, असं सरन्यायाधीशांनी म्हटलं. तर राहुल नार्वेकरांना स्पष्ट शब्दांत आदेश देण्यात आले आहेत की, मंगळवारी (17 ऑक्टोबर) विधानसभा अध्यक्षांनी नवं वेळापत्रक सादर करावं. जर निश्चित वेळापत्रक अध्यक्षांकडून येऊ शकलं नाहीतर मात्र नाईलाजास्तव सर्वोच्च न्यायालयाला विशिष्ट टाईमलाईन आखून द्यावी लागेल. दोन महिन्यांची टाईमलाईन असून शकते, ज्यामध्ये अध्यक्षांना बंधनकारक असेल, असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *