शाळांच्या शैक्षणिक गुणवत्ता व भौतिक सुविधा पूर्ततेसाठी शिक्षण विभागाकडून अंमलबजावणी सुरू आ. निलंगेकर यांच्या आढावा बैठकीतील सुचनाचे पालन
निलंगा :निलंगा तालुक्यातील सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी प्रत्येक शाळेत उत्तम दर्जाचे शिक्षण व सोयी सुविधा तात्काळ उपलब्ध करून देण्याच्या सूचना माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी निलंगा येथील आढावा बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना केल्या होत्या त्या सूचनेचे तात्काळ अंमलबजावणी सुरू झालेली आहे.निलंगा तालुक्यातील सर्व प्राचार्य मुख्याध्यापक सर्व माध्यमाच्या व व्यवस्थापनाच्या शाळा महाविद्यालय याना पंचायत समिती शिक्षण विभागाने परिपत्रक काढून सुचित केले आहे, की, दि. 12 ऑक्टोबर रोजी माजी मंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर आढावा बैठकीत तालुक्यातील सर्व शाळांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी व भौतीक सुविधाच्या पुर्ततेसाठी सुचना केलेल्या होत्या त्याची अंमलबजावणी निलंगा शिक्षण विभागाकडून चालू करण्यात आली आहे.
आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी खालील सुचनांची अमलबजावणी.करण्याच्या सूचना दिल्या आहेत यात शाळेत सर्व मुलांसाठी, विशेषतः मुलींसाठी स्वच्छता गृह अद्यावत करुन नियमित स्वच्छता ठेवण्यात यावी. स्वच्छतागृहाची नियमित स्वच्छतेसाठी ग्रामसेवक , सरपंच , शाळा व्यवस्थापन समिती यांच्या मदतीने नियमित कायमस्वरुपी पाण्याची सोय करुन घ्यावी. शाळेतील महिला शिक्षिकेच्या मदतीने मुलींना सॅनटरीनॅपकीन वापरासंबंधाने जाणीव जागृती निर्माण करावी. मुलींच्या स्वच्छतागृहाशेजारी सॅनटरीनॅपकीन विल्हेवाटीसाठी डस्टबीन ठेवण्यात यावे.शाळेत सर्व भौतिक सुविधा उपलब्ध राहतील याची दक्षता घ्यावी. जसे पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहातील पाण्याची व्यवस्था, साफसफाई, प्रत्येक वर्गात कचराकुंडी, किचन शेडची स्वच्छता. इत्यादी. प्रत्येक शाळेमध्ये किमान दोन खेळांचे मैदान आखलेले असावे त्यामध्ये दररोज मैदानी खेळाचा सराव घेण्यात यावा. दैनंदिन शैक्षणिक अध्यापनात तंत्रज्ञानाचा वापर करण्यात यावा. दैनंदिन परिपाठातून नैतिक मुल्ये व सामाजिक जबाबदा-या यांचे शिक्षण देण्यात यावे…
दररोज स्पर्धा परीक्षा विविध शिष्यवृती परीक्षा तासिका घेण्यात याव्यात. सत्रातून एकदा मुलींसाठी आरोग्य विषयक जाणीवजागृती शिबीर तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात यावे. शालेय परिसर तंबाखू मुक्त अंमली पदार्थ मुक्त ठेवण्यात यावे.आशा अकरा सूचना करण्यात आल्या आहेत लातूर जिल्हा परिषदे मध्ये पूर्वी अतिशय अल्प प्रमाणात शिक्षण विभागावर खर्च केला जात होता परंतु लातूर जिल्हा परिषदेवर माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या माध्यमातून लातूर जिल्हापरिषदेवर भारतीय जनता पक्षाची एक हाती सत्ता आल्यानंतर त्यांनी शिक्षण विभागावर भरीव आर्थिक तरतूद केली, त्यामुळे जिल्हापरिषद शाळेत विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढली जिल्हापरिषद शाळेतील शैक्षणिक गुणवत्ता वाढली अनेक शाळा डिजिटल झाल्या शाळेतील शिक्षकांचे रिक्त पदे भरण्यात आले पात्र शिक्षकांना पदोन्नती देण्यात आली शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यात आले
माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांचे विशेष लक्ष जिल्हा परिषद शाळेवर आहे. कारण या शाळेत शिकणारा विध्यार्थी हा सामान्य शेतकरी, शेतमजूर, दीन दलित,अल्पसंख्याक, भटके विमुक्त, बहुजन समाजातील असल्यामुळे खाजगी शाळेतील शिक्षणाचा खर्च त्यांना परवडत नसल्यासमुळे जिल्हापरिषद शाळेची गुणवत्ता वाढविणे त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची सुविधा उपलब्ध करून देणे हे आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांची सर्वोच्च प्राथमिकता आहे त्याचाच प्रत्यय आढावा बैठकीत आला