• Thu. Aug 21st, 2025

जागृती शुगर कारखान्याच्या वतीने दसरा दिवाळी निमित्ताने सभासदांना सवलतींच्या दरात साखर

Byjantaadmin

Oct 14, 2023
जागृती शुगर कारखान्याच्या वतीने दसरा दिवाळी निमित्ताने सभासदांना सवलतींच्या दरात साखर
लातूर – राज्यातील खाजगी साखर कारखानदारीत मराठवाडा व विदर्भात अव्वल स्थानावर असलेल्या व एफ आर पी पेक्षा अधिक भाव देणाऱ्या लातूर जिल्ह्यांतील देवणी तालुक्यातील तळेगाव येथील जागृती शुगर अँड अलाईंड इंडस्ट्रीज लि. कारखान्याच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी दसरा व दिवाळी सणाच्या निमित्ताने सभासदांना व कर्मचारी यांना सवलतींच्या दरात साखर वाटप करण्यात येणार असुन यामुळे जागृती शुगर सभासदांची दिवाळी गोड होणार आहे
जागृती शेतकऱ्यांची प्रगती या ब्रीद वाक्या प्रमाणे या साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांची आर्थिक क्रांती घडली आहे दरवर्षी प्रमाणे याही वेळी दसरा दिवाळी निमित्ताने सभासदांना सवलतींच्या दरात साखर वाटप करण्याच्या निर्णय कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री दिलीपराव देशमुख साहेब यांनी घेवून तशा सूचना दिल्या आहेत त्यानुसार कारखान्याच्या सभासदाना प्रतीकिलो दर २५ रुपयाप्रमाने १५ किलो साखर  देण्यात येणार आहे यासाठी  सभासदांनी २० ऑक्टोंबर ते २७ ऑक्टोंबर पर्यंत आपल्या शेतकरी गट कार्यालयात सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत संपर्क साधून वेळेत साखर घेवून सहकार्य करावे असे आवाहन  कारखान्याच्या अध्यक्षा तथा कार्यकारी संचालक सौ गौरवी अतुल भोसले ( देशमुख) कारखान्याचे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे, सरव्यवस्थापक गणेश येवले यांनी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *