प्रा. डॉ. तरंगे सरांचे श्री कोचिंग क्लासेस निलंगा जिल्हा-लातूर येथे विध्यार्थी-पालक मेळावा संपन्न
रविवार दि 8 ऑक्टोबर 2023 रोजी विद्यार्थी-पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, यासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालकानी उपस्थिती लावली.
क्लासेसचे संचालक प्रा.डॉ गजेंद्र तरंगे सरांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये बोलत असताना विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी क्लासेसमार्फत राबविण्यात येणार सर्व उपक्रम, परीक्षा पॅटर्न, अभ्यासमालिक तसेच संपूर्ण वर्षभर विद्यार्थ्यांकडून करून घेण्यात येणाऱ्या तयारीविषयी सविस्तर माहिती विद्यार्थी व पालकांना दिली.
पुढे ते बोलत असताना म्हणले की विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी जेवढे आम्ही शिक्षक प्रयत्नशील आहोत तेवढेच विध्यार्थ्यांनी व पालकानीं सुद्धा प्रयत्नशील असले पाहिजेत. पालकांनी वेळोवेळी क्लासेसला भेट देऊन आपल्या विध्यार्थ्यांच्या प्रगतीविषयी चर्चा केली पाहिजे.
11 वी व 12 वी Science च्या विध्यार्थ्यांसाठी NEET, JEE, MHT-CET परीक्षेच्या विशेष तयारीसाठी कोटा राजस्थान, तसेच भारतातील नामांकित इन्स्टिट्यूट मधील Expert Faculty श्री कोचिंग क्लासेसमध्ये उपलब्ध करून दिलो आहोत 11 वी व 12 वी च्या तयारीसाठी कोल्हापूर, पुणे, बीड, अमरावती, सोलापूर, चंद्रपूर अशा महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील विध्यार्थी निलंगा येथे क्लासेसमध्ये प्रवेश घेऊन शिकत आहेत
मागील 23 वर्षांपासून क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून अनेक विद्यार्थी घडविण्याचे कार्य क्लासेमार्फत सुरू आहे व यापुढेही आपल्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी कायम कटिबद्ध असू असे ते म्हणाले. कोरोना काळात सुद्धा विद्यार्थ्यांसाठी क्लासेसमार्फत ऑनलाइन पद्धतीने क्लासेस व Co-ordinator द्वारे घरपोच नोट्स, worksheet परीक्षेचे पेपर देण्यात आले, ज्यामुळे विध्यार्थ्यांचे शिक्षण सुरूच राहील. याच कार्याची दखल घेत क्लासेसला BEST ONLINE EDUCATIONAL INSTITUTE IN MAHARASHTRA 2022 तसेच INTERNATIONAL ONLINE EDUCATOR OF THE YEAR 2022 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आजही महाराष्ट्रातील संपूर्ण 36 जिल्ह्यामध्ये विध्यार्थी समाधानकारक ONLINE क्लास करीत आहेत असे त्यांनी सांगितले
मेळाव्यात पालकांनी सुद्धा आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या, ज्यामध्ये श्री मारुती शिंदे गाव-अनसरवाडा यांनी बोलत असताना सांगितले की माझे दोन्ही विध्यार्थी सरांकडे शिकले आहेत व मोठा मुलगा सरामुळेच आज चांगल्या पद्धतीने इंजिनिअरिंग चे शिक्षण पूर्ण करत आहे, तसेच प्रा.डॉ.तरंगे सरामार्फत “शैक्षणिक निलंगा पॅटर्न” निर्माण करण्याचे कार्य सुरू आहे व ते हे करतीलच असा विश्वास त्यांनी बोलून दाखविलाश्री विनोद पाटील गाव-तळीखेड यांनी म्हंटले की, विद्यार्थ्याच्या प्रगतीसाठी सर कायम कार्य करीत राहतात, सतत वैयक्तिक कॉल, मेसेज द्वारे पालकांशी संपर्क करीत असतात ज्यामुळे आमच्या विद्यार्थ्याची प्रगती निश्चित होईल अशी समाधानकारक प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली
यावेळी क्लासेसचे संचालक प्रा. डॉ.गजेंद्र तरंगे, प्रा.सोमेश्वर स्वामी, प्रा. तुकाराम शिंदे, प्रा. गोपाळ मडीवाळ, प्रा. अबदेश ठाकूर(नोएडा, दिल्ली), प्रा. आशुतोष प्रधान (पाटणा, बिहार) प्रा. निकिता नांदूरकर (चंद्रपूर) व क्लासेसची सर्व टीम उपस्थित होती.