• Wed. Aug 20th, 2025

युवक महोत्सवातील विडंबनात शासनाच्या कंत्राटी धोरणाला विरोध राजकारणातील तमाशा केला उजागर

Byjantaadmin

Oct 14, 2023

युवक महोत्सवातील विडंबनात शासनाच्या कंत्राटी धोरणाला विरोध राजकारणातील तमाशा केला उजागर
लातूर: शासनाचे नोकरी विषयक धोरण त्यामुळे उच्च पदाची नोकरीही कशी कंत्राटी झाली ,राजकारणातील तमाशा आदी विषयांवर ‘विडंबन’ या कलाप्रकारात युवकांनी नाराजीचा सूर व्यक्त केला. दयानंद कला महाविद्यालयात ‘ज्ञानतीर्थ’ २०२३ आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सवात डॉ.श्रीराम लागू कला मंचावर युवा कलावंतानी राजकारणाच्या बाजारावर आसूड ओढले. अचानकपणे प्रमुख स्वपक्षातून फुटून इतर राजकीय पक्षात दाखल होत सत्ता प्रस्थापित करणाऱ्या नेत्यांचा चांगलाच समाचार घेतला.
नांदेड येथील एम जी एम अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या श्रावणी पवार,सुशील कुलकर्णी, स्नेहा थोरवट, मथुरा राजूककर,प्राची देशमुख यांच्या विडंबनाला चांगलीच दाद मिळाली.
तर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथील कॅम्पस मधील सिद्धांत दिग्रसकर , सुदर्शन चिंतारे,यज्ञश सुर्यवंशी, गौरी चौधरी, प्रीतक इंगोले आदी युवक कलावंतांनी
आम्हाला अच्छे दिन नको दोन वेळची भाकरी,राहायला घर द्या..क शेतकरी आर्थिक उन्नती पासून मागेच राहिला त्यास सुखी करा.हे सांगितले.
‘ ‘ देशात नरेंद्र, आय पील एल मध्ये महेंद्र, महाराष्ट्रात देवेंद्र आणि एकटा पडला शरदचंद्र’ यावर प्रकाश टाकला.
महिलांवर मणिपूर येथे अत्याचार होतो आणि दुसरी कडे महिलांना आरक्षण. हा विरोधाभास विडंबनातून धर्माबाद येथील लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयाच्या च्या निखिल भेरजे,
यमाजी इपतेकर,नागेश वाघमारे, जयविकास गायकवाड, अनिल भद्रे,विकास आडपोड मांडला. या कला प्रकारास प्रेक्षकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *