केमिस्ट संघटनेच्या एकिचा व्हिजनरीचा आदर्श ईतर व्यापारी संघटनांनी घ्यावा – अरविंद पाटील निलंगेकर
निलंगा (प्रतिनिधी );-केमिस्ट संघटनेचे देश राज्य जिल्हा व तालुका पातळीपर्यंत संघटनात्मक काम मजबूत व व्हिजन असलेली संघटना आसुन व्यवसायातील अडचणी साेडवणुक भविष्यात येणाऱ्या प्रत्येक अडचणीचा सामाना करण्यासाठी अभ्यासात्मक लढा देणारी संघटना असलेली एकमेव व्यापारी संघटना आहे तेव्हा ईतर व्यापारी संघटनांनी याचा आदर्श घेत व्यापारात भविष्याचा वेध घेणे गरजेचे आहे असे प्रतिपादन भाजपाचे प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर यांनी निलंगा तालुका केमिस्ट संघटनेच्या कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर व नवनिर्वाचित तालुका पदाधिकारी साेहळा यावेळी बाेलताना म्हणाले यावेळी अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त रुद्रमणी पाेंगळे केमिस्ट संघटनेचे जिल्हा अध्यक्ष रामदास भाेसले सचिव अरुण साेमाणी मराठवाडा उपाध्यक्ष अतुल काेटलवार अनिल स्वामी ओम बाहेती निलंगा तालुका अध्यक्ष बालाजी थेटे सचिव राजेंद्र धुत उदगीर तालुका अध्यक्ष सत्यवान बाेराेळकर औसा तालुका अध्यक्ष संजय भालकिकर निलंगा बाजार समीतीचे उपसभापती लाला साहेब देशमुख संचालक राेहित पाटील रमेश भांगडीया लातुर जिल्ह्यातील पाणी टंचाई वर नियोजन म्हत्वाचे असुन व्यापार उधाेग शेती टिकण्यासाठी पाणी गरजेचे आहे पाण्यासाठी राबवत असलेल्या माेहीमेत व्यापारी यांना सहभाग नाेंदवावा असे आव्हान यावेळी त्यांनी उपस्थितांना केले यावेळी साेमनाथ आग्रे, वैभव पाटील, अरविंद गडीकर, विकास साेळुंके, दत्ता पाटील, अनिल धुमाळ , ओम आग्रे, किशन बाहेती, बाबुराव महाजान, दयानंद बाेलशट्टे, दिपक नाईक, हर्षवर्धन सातपुते, विशाल नेलवाडेव, हंसराज शिंदे, उमाकांत पाटील , राजप्पा शंकद, मनाेज पाटील, संजय पवार, संजय माने , भाग्यश्री मांजरीकर , कालिदास पाटील, शेखर पाैळ, अजय पेठकर, आदि उपस्थित हाेते ड्रगच्या विळख्यात अडकणारया तरुणाला सावरण्याची जबाबदारी औषध विक्रेत्याची सहाय्यक आयुक्त रुद्रमणी पाेगंळे
नशेची अनेक प्रकार आहेत पण कमी किमतीत व सहज नशा करण्यासाठी तरुण पिढी नारकोटिक्स ड्रगकडे वळताना दिसुन येत आहे हे राखण्यासाठी सामाजिक दायित्व म्हणून
औषध विक्रेत्यांनी प्रयत्न करावे असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त रुद्रमणी पाेंगळे म्हणाले गेल्या काही महिन्यांपासून हल्ली तरुणांमध्ये नशेसाठी नारकाेटिक्स ड्रगचा वापर करताना आढळून आला आहे तेव्हा औषध विक्रेत्यांनी नार्कोटिक्स कायद्याचे पालन करून डॉक्टरांच्या चिठ्ठीवरतीच योग्य तेवढ्या मात्रांमध्ये औषधी गरजवंताला पुरवावे असे प्रतिपादन केले