जागतिक भरडधान्य वर्षा निमित्त महाराष्ट्र महाविद्यालयात भित्तिपत्रक प्रदर्शन
निलंगा: येथील महाराष्ट्र महाविद्यालयाच्या बि.व्होक. शाखेअंतर्गत फुड प्रोसेसिंग प्रिझर्वेशन ॲण्ड स्टोरेज विभागाच्या वतीने भित्तीपत्रक स्पर्धा आयोजित करण्यात आली. संयुक्त राष्ट्र संघटनेने सध्याचे चालू वर्ष जागतिक भरडधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. भरड धान्य म्हणजे लहान बीज असलेल्या तृण वर्गीय पिकांचा एक अत्यंत वैविध्यपूर्ण गट. साधारणतः भरडधान्य ही आकाराने बारीक, गोलाकार तसेच खाण्यासाठी जशीच्या तसीच वापरता येतात. भरड धान्य आरोग्यदायी असतात. भरडधान्य केवळ वाईट कोलेस्टेरॉल कमी करते असे नाही तर उपयुक्त कोलेस्टेरॉल वाढवण्यासाठीही उपयोगी ठरते. त्याच्या आहारातील उपयोगाने रक्तदाब कमी होतो.हृदयविकार,मधुमेह यासारख्या बळावत चाललेल्या आजारांवर भरडधान्य प्रतिबंध घालण्यासाठी उपयुक्त ठरतात. याचाच एक भाग म्हणून विद्यार्थ्यांनी भरडधान्य या विषयावर वैविध्यपूर्ण भित्तिपत्रकांचे प्रदर्शन केले.
या भित्तिपत्रकामध्ये विद्यार्थ्यांनी ज्वारी ,बाजरी ही आकाराने मोठी असलेली तर नाचणी, राळे, चेना, वरी, मगर, कोद्रा, कुट्टु, बतुआ, कुटकी, राजगीरा इत्यादी भरडधान्यांची माहीती, त्यांची उपयुक्तता, शारीरीक स्वास्थ्य टिकण्यासाठीचे गुणधर्म इत्यादी माहीती देणारे भित्तिपत्रक प्रदर्शित केले होते. या भित्तिपत्रक प्रदर्शनाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव कोलपुके यांनी केले. या स्पर्धेचे परीक्षण म्हणून डॉ. धनंजय जाधव, प्रा. सुरेश कुलकर्णी यांनी केले. भित्तिपत्रक प्रदर्शनासाठी विद्यार्थ्यांना नोडल ऑफीसर डॉ. मिलींद चौधरी, प्रा. सोनम पाटील, प्रा. सचीन शिंदे, प्रा. श्रीनिवास काकडे, प्रा. अभिमन्यू गंगाजी, प्रा. राजेश जाधव यांनी मार्गदर्शन केले. या प्रदर्शनाच्या यशस्वितेसाठी प्रा. रामदास आत्राम, प्रा. विष्णु रेड्डी, प्रा. अशोक तुगावे, आजम शेख, बिराजदार शांतविर, गणेश गड्डे इत्यादिंनी परिश्रम घेतले.