• Thu. Aug 21st, 2025

ना. उदय सामंत, ना. संजय बनसोडे यांच्या हस्ते ‘माझी माती, माझा देश’ अभियान अमृत कलशांचे पूजन

Byjantaadmin

Oct 13, 2023

ना. उदय सामंत, ना. संजय बनसोडे यांच्या हस्ते माझी माती, माझा देशअभियान अमृत कलशांचे पूजन

लातूर, दि. 13 (जिमाका) : ‘मेरी माटी, मेरा देश-माझी माती, माझा देश’ अभियान अंतर्गत जिल्ह्यातील माती दिल्ली येथे अमृत वाटिका निर्मितीसाठी जाणार आहे. जिल्ह्यातील 10 पंचायत समितीमधून आलेल्या कलशांचे पूजन जिल्हाधिकारी कार्यालय येथे उद्योगमंत्री उदय सामंत, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोड यांच्या हस्ते करण्यात आलेआमदार विक्रम काळे, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, सहायक जिल्हाधिकारी नमन गोयल, माजी आमदार गोविंद केंद्रे यावेळी उपस्थित होते.जिल्ह्यातील ग्रामीण भागातून प्रत्येक पंचायत समितीमधून एक असे 10, जिल्ह्यातील 9  नगरपालिका व नगरपरिषदेतून एक आणि महानगरपालिकेचा एक अमृत कलश असे एकूण 12 अमृत कलश मुंबई येथे रवाना होतील. दिल्ली येथे उभारण्यात येणाऱ्या अमृत वाटिकेसाठी या कलशातील माती वापरली जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *