विविध मागण्यांसाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने लातुरात निदर्शने
आरक्षणाचे प्रश्न अग्रक्रमाने सोडवा.
कंत्राटी भरती.खाजगीकरण लोकविरोधी धोरणे बंद करा. अन्यथा महाराष्ट्रात उद्रेक अटळ.
संभाजी ब्रिगेडचा मुख्यमंत्र्यांना इशारा.पि व्हि आर चौकात तिव्र निदर्शने
लातुर. महाराष्ट्र शासनाने आपले लोकविरोधी धोरण ताबडतोब थांबवले पाहिजे अन्यथा महाराष्ट्रात उद्रेक अटळ आहे असा इशारा संभाजी ब्रिगेड लातूर तर्फे मुख्यमंत्र्यांना लातूर जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवेदन देऊन देण्यात आला यापूर्वी पि व्हि आर चौकात महाराष्ट्र शासना विरोधात घोषनावाजी करून तिव्र निदर्शने करण्यात आली.मराठा. कुणबी.ओ बी सी. धनगर. आरक्षण आंदोलनाने महाराष्ट्रभरात पेट घेतला असता हे प्रश्न निकालात काढायचे सोडून शासन जाती जातीत भांडण लावत आहे. तरूण बेरोजगारांना कायमस्वरूपी नौकरी देण्याचे सोडून सगळीकडे तहसीलदार ते शिपाई कंत्राटी नौकर भरती सुरू आहे . शासन जिल्हा परिषद शाळा बंद करून काही शासकीय शाळा खाजगी उद्योगपतीच्या घशात घालत आहे. शासकीय रुग्णालय खाजगी व्यवस्थापणाला देत आहे त्यामुळे रोज शेकडो रुग्ण जीव गमावत आहेत तरी शासन आपले लोकविरोधी विघातक धोरणे पुढे रेटत आहे ते ताबडतोब थांबवले पाहिजे अन्यथा संभाजी ब्रिगेड महाराष्ट्रभर आज निदर्शने आंदोलन करत आहे पुडे यापेक्षा फार मोठा उद्रेक अटळ आहे असा इशारा निवेदनाद्वारे देन्यात आला निवेदनावर संभाजी ब्रिगेड प्रदेश संघटक उमाकांत उफाडे .महानगर अध्यक्ष मिथुन दिवे. जिल्हा सचिव रफिक शेख. तालुकाध्यक्ष अॅड मनोजकुमार नरवडे. विद्यार्थी आघाडी लातूर शहराध्यक्ष अशिष अजगरे. शिक्षक आघाडी जिल्हाध्यक्ष गजानन जाधव पाटील .उमेश बालकिसन ऊफाडे. सुनिल अशोक उफाडे. शंकर वाघमारे. हनमंत रघुनाथ उफाडे. अरुण शिंदे. बालासाहेब साळुंके. रमेश भिसे. चंद्रकांत देशमुख. चंद्रकांत इरळे. युवराज माने. भाऊसाहेब रमेश पाटील. अॅड शेखफरीद शेख. अनंत बोडके. गोपाळ वाघमोडे. धिरज शिंदे. कोंडीराम उफाडे. गोपाळ डुरे. लक्ष्मण रामकीसन उफाडे. गोवर्धन बोडके. महेताब शेख. दिनेश सलगर. संतोष भिसे. अनसर अफसर शेख. अशिष बालासाहेब साळुंके टाकळीकर यांच्या स्वाक्षरी आहेत.