• Sat. May 10th, 2025

सौ.दीपशिखाताई देशमुख व आ.धिरज देशमुख यांना भेट स्वरूपात आलेल्या पुर्व माध्यमिक परिक्षेच्या पुस्तकांचे वाटप

Byjantaadmin

Oct 13, 2023
लातूर :–वाचन संस्कृती जोपासली जावी यासाठी प्रयत्न करत असताना “रीड लातूर” उपक्रमाची सुरूवात करून त्या माध्यमातून एक चळवळ उभी करण्यात आली. “रीड लातूर” उपक्रमाचे समाजातील विविध घटकातील व्यक्तींनी या उपक्रमाचे मनापासून स्वागत करून आपला सहभाग यामध्ये नोंदवला.
“रीड लातूर”उपक्रमाच्या  संस्थापक सौ.दीपशिखाताई धिरज देशमुख व आ.धिरज विलासराव देशमुख यांना सदिच्छा भेटी दरम्यान मागील काही महिन्यात अनेक मान्यवरांनी इयत्ता ५ वी व इयत्ता ८ वी पुर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परिक्षेची पुस्तके भेट स्वरूपात दिली होती. सदरील पुस्तके लातूर ग्रामीण मधील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी कामी यावीत या उद्देशाने “रीड लातूर” उपक्रमाच्या संस्थापक सौ. दीपशिखाताई धिरज देशमुख यांच्या हस्ते ही पुस्तके संबंधित शाळेतील शिक्षकांकडे सुपूर्द करण्यात आली.
यावेळी शिक्षक सर्वश्री विजयकुमार कोळी,(टाकळी शि),रावसाहेब भामरे (रेणापूर),विजय माळाळे (काटगाव), मुजावर नजीर महम्मद साब, चपटे सुमन,(भेटा)
ज्ञानेश्वर साळुंके ( टाका), आर.डी.गायकवाड (बाभळगाव),तुकाराम नागरगोजे( ममदापुर),दत्तात्रय गिरी( एकुर्गा),विकास पुरी (ढाकणे),साहेबराव कांबळे  ( ममदापुर), श्रीकांत सिरसाट,शिवराज सोदले(शिऊर),विशाल जोगदंड,प्रणिता जोगदंड, गोपाल भुतापल्ले,फरीद शेख,डुबेवार सर, नवगिरे मॅडम व रीड लातूर चे समन्वयक राजू सी पाटील यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *