स्वारातीम विद्यापीठाच्या कला शाखेतून ‘महाराष्ट्र’ची कु.सुषमा बेलकुदे सर्वद्वितीय
_विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत महाराष्ट्र महाविद्यालयाची परंपरा कायम_
निलंगा – येथील महाराष्ट्र महाविद्यालयाची विद्यार्थ्यांनी कु. सुषमा बेलकुंदे हिने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने उन्हाळी-२०२३ मध्ये घेतलेल्या पदवी परीक्षेत कला शाखेतून विद्यापीठातून सर्वद्वितीय क्रमांक मिळून महाविद्यालयाच्या यशाची परंपरा कायम राखलेली आहे. या आधीच सुवर्णपदकांच्या जाहीर झालेल्या विद्यापीठ यादीत तिने राज्यशास्त्र या विषयात सर्वाधिक गुण घेऊन नूतन विद्यालय शिक्षण संस्था, शेलु.जि.परभणी व स्वातंत्र्य सेनानी कै. दिपाजी पाटील सुवर्णपदक अशा दोन सुवर्णपदकांची मानकरी ठरली होती. आणि आता विद्यापीठाने जाहीर केलेले कला शाखेतील पहिल्या तीन विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता यादीत कु. सुषमा बेलकुंदे हिने मिळवलेले यश कौतुकास पात्र ठरले आहे. तिच्या या यशाबद्दल महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष मा. श्री. विजयकुमार शिवाजीराव पाटील निलंगेकर, सचिव मा.श्री. बब्रूवानजी सरतापे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधवराव कोलपुके, महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने तिचा सत्कार करून अभिनंदन केले व पुढील शिक्षणासाठी तिला शुभेच्छा दिल्या.