अकोला : ajit pawar मुख्यमंत्री होणार हे स्वप्न आहे, ते प्रत्यक्षात घडणार नाही, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष(Sharad Pawar) यांनी बोचरा वार केला. शरद पवार आज akola दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी सहकार मेळाव्याला हजेरी लावली. या मेळाव्यानंतर त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. प्रकाश आंबेडकर यांना इंडिया आघाडीत (I.N.D.I.A.)घेण्यास आम्ही सकारात्मक आहोत. त्याबाबत लवकरच निर्णय घेणार असल्याचं शरद पवार यांनी सांगितलं. जर अजित पवार मुख्यमंत्री झाले तर मी स्वत: त्यांना हार घालेन असं राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या. त्याबाबत शरद पवारांना विचारण्यात आलं. त्यावर पवार म्हणाले, “हे स्वप्न आहे, ते प्रत्यक्षात घडणार नाही”
प्रकाश आंबेडकरांना इंडिया आघाडीत घेणार?
यावेळी शरद पवार यांनी प्रकाश आंबेडकरांच्या इंडिया आघाडीतील समावेशाबाबत भाष्य केलं. “प्रकाश आंबेडकरांनी यापूर्वी काय झालं याचा विचार न करता पुढचा विचार करावा की त्यांना आघाडीत यायचं आहे का? प्रकाश आंबेडकर इंडिया आघाडीच्या पुढील बैठकीला असतील की नाही ते आघाडी आणि प्रकाश आंबेडकर ठरवतील. आमचा आग्रह हाच असणार आहे की जे तीन पक्ष एकत्र आलो आहोत त्यांचंच सरकार येईल. प्रकाश आंबेडकरांना इ़ंडिया आघाडीत घेण्यास आम्ही सकारात्मक आहोत. त्याबाबत लवकरच निर्णय घेणार”, असं शरद पवार म्हणाले.
शरद पवार काय काय म्हणाले?
जनमानसात आम्हाला मिळणारा प्रतिसाद मतांत परिवर्तित झाला तर आमची सत्ता येईल. सुप्रिया सुळेंना पक्षाध्यक्ष करा हा छगन भुजबळांचा प्रस्ताव होता. मी उद्योगपती गौतम अदाणी यांच्या औषधाच्या कारखान्याच्या उद्घटनाला गेलो. सार्वजनिक कार्यक्रमात जावं लागतं. अजित पवार मुख्यमंत्री होणार हे स्वप्न. देशात अनेक भागात भाजप नाहीय. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा काढणं ही सरकारची जबाबदारी आहे,आमची नव्हे.
भुजबळांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना जास्त महत्व देण्याची गरज नाही
पक्षात फूट आम्ही पाडली नाही : शरद पवार
आमची भूमिका स्वच्छ. पक्षात फूट आम्ही पाडली नाही. आम्हाला खात्री आहे की आम्हाला आमचा पक्ष म्हणून आमचं म्हणणं मांडण्याची संधी मिळेल.उद्या कुणी युनायटेड नेशन्सचा अध्यक्ष म्हणून पत्र लिहील. आमची भूमिका स्पष्ट आहे पक्षात फूट आम्ही पाडली नाही, असं शरद पवार म्हणाले.