विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा साखर कारखाना लि. विलासनगर, ता.जि.लातूर
सभासद व कर्मचारी यांना सवलतीच्या दरात साखर वाटप
विलास नगर :– सर्व सभासदांना कळविण्यात येते की, सहकार महर्षि आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब, मा.आ.अमितजी देशमुख साहेब व आ. धीरजजी देशमुख साहेब यांच्या सुचने प्रमाणे
प्रती वर्षाप्रमाणे दसरा व दीपावली सणानिमित्त प्रति सभासदांस ५० (पन्नास किलो) साखर प्रति किलो रु.२५.०० ( पंचवीस )या सवलतीच्या दरात दि.१२/१०/२०२३ ते २१/१०/२०२३ या कालावधीमध्ये सकाळी ८.३० ते ५.३० यावेळेत शेतकी विभागाच्या गट कार्यालयाचे ठिकाणी साखर वाटप करण्यात येणार आहे…
तरी सर्व सभासदांना विनंती की, आपण आपल्या गटावरून वेळेत साखर घेवून सहकार्य करावे असे आवाहन विकास रत्न विलासराव देशमुख मांजरा साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन श्रीशैल ऊटगे,
श्री. पंडित देसाई, कार्यकारी संचालक यांनी केले आहे.
विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा साखर कारखाना ; सभासद व कर्मचारी यांना सवलतीच्या दरात साखर वाटप
