• Sat. May 3rd, 2025

लेक लाडकी योजना, औरंगाबाद विद्यापीठाचं नाव आता छत्रपती संभाजीनगर; शिंदे-फडणवीस-पवार सरकारचे 7 निर्णय

Byjantaadmin

Oct 10, 2023

शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या (Shinde-Fadnavis-Pawar Government)  (State Cabinet) मंत्रालयात आज बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. तसेच, राज्यातील पिक पाण्याचाही आढावा घेण्यात आला. या बैठकीत राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना राबवली जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, ल(Aurangabad University) नावात औरंगाबाद ऐवजी (Chhatrapati Sambhajinagar) बदल करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

सीएमओ ऑफिसच्या वतीनं मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांसंदर्भात एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.” lतसेच, यासह मंत्रिमंडळात घेण्यात आलेल्या 7 निर्णयांची माहिती दिली आहे.

शिंदे-फडणवीस-पवार सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय 

  • राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना. मुलींना करणार लखपती. (महिला आणि बालविकास)
  • सार्वजनिक खासगी भागीदारीतून उदंचन जलविद्युत प्रकल्पासाठी धोरण. मोठ्या प्रमाणावर खासगी गुंतवणूक जलविद्युतमध्ये येणार.  (जलसंपदा विभाग)
  • सांगली, अहमदनगर जिल्ह्यात  जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालये(विधि आणि न्याय विभाग)
  • पात्र माजी खंडकरी शेतकऱ्यांना 1 एकरापेक्षा कमी जमीन मिळणार. (महसूल विभाग)
  • फलटण ते पंढरपूर नवीन ब्रॉडगेज रेल्वेमार्ग आता रेल्वे मंत्रालयातर्फे पूर्ण करणार( परिवहन विभाग)
  • भोसला मिलिटरी स्कूलला नागपूर येथे जमीन( महसूल आणि वन विभाग)
  • विद्यापीठाच्या नावात औरंगाबाद ऐवजी छत्रपती  संभाजी नगर बदल करण्यास मान्यता( उच्च आणि तंत्र शिक्षण)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *