जखमी मनोरूग्णावर जाकिरने केले उपचार…
निलंगा/प्रतिनिधी
निलंगा शहरात जखमी अवस्थेत रस्त्यावर पडलेल्या एका मनोरूग्णावर जाकिर सामाजिक संस्थेच्या वतीने उपजिल्हा रूग्णालयात उपचार करून त्यास जीवनदान देण्याचे कार्य केल्याने सर्वञ कौतुक होत आहे.
निलंगा शहरात दिनांक १० रोजी डोक्याला गंभीर इजा झालेला वृध्द मनोरूग्ण शहरातील मुख्य रस्त्यावर विव्हळत पडला होता.याची माहिती जाकिर सामाजिक संस्थेचे अध्यक्ष जाकिर शेख याना फोनवरून कोणीतरी देताच त्यानी तात्काळ मनोग्णास येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले व त्यास उपचार करून त्याचे प्राण वाचविल्यने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणाऱ्या जाकिर संस्थेला हक्काची जागा नसल्याने अनेक मनोरूग्णाना उपचार करून त्याना सोडून देण्यात येत आहे.कर्नाटक राज्य निलंगा तालुक्याच्या अगदी जवळ असल्याने तेथील काही मनोरूग्ण गाडीमध्ये बसवून निलंगा शहरात आणून सोडले जात असल्याने मनोरूणांचे हाल होत आहेत.जाकिर सामाजिक संस्थेने रस्त्यावर भटकत फिरणा-या मनोरूग्णाची साफ सफाई करून नवीन कपडे घालून शेकडो मनोरूणांची सेवा केली आहे.
यावेळी जाकीर शेख, ऋषिकेश पोतदार,शिवाजी वागले, अबू सय्यद, राहुल पोतदार आदि या सामाजिक कार्यात मदत केली आहे.