• Sat. May 3rd, 2025

भाजपला अर्धा वाटा, शिवसेना आणि दादांच्या राष्ट्रवादीला पाव-पाव, विधीमंडळ समित्यांचा फॉर्म्युला ठरला!

Byjantaadmin

Oct 10, 2023

राज्यातील महामंडळ समित्यांचा फॉर्म्युला ठरला आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बंड करत महायुतीला पाठिंबा दिला.  राष्ट्रवादीच्या समावेशामुळे महामंडळ वाटपाचा नवा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला आहे.  भाजप-शिवसेना-राष्ट्रवादीमध्ये 50:25:25 प्रमाणात समित्यांचे वाटप होणार आहे. महायुती समन्वय समितीच्या आजच्या बैठकीत होणार अंतिम निर्णय होणार आहे. महायुतीची समन्वय समिती आज दुपारी 3.30 वाजता  पत्र देणार आहे.

सुरुवातीला शिवसेना आणि भाजपचं सरकार होतं, मात्र आता सत्तेमध्ये अजित पवार गटाचा देखील समावेश झाला आहे. त्यामुळे महामंडळ वाटपाचा नवा फॉर्म्युला तयार करण्यात येणार आहे. आमदारांच्या संख्येनुसार महामंडळाचं वाटप होणार असल्याची माहिती  मिळाली आहे. महायुतीमध्ये 50: 25 : 25 या सुत्रानुसार वाटप करण्यत आले आहे. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांकडे अनेक महत्त्वाची खाती सोपावण्यात आली आहेत.  विधानसभा व विधानपरिषदेच्या एकूण 28 समित्यांवर आमदारांची नेमणूक होणार आहे.  समित्यांच्या अध्यक्ष व सदस्य पदांची यादी समन्वय समिती विधीमंडळात देणार आहे. विधानसभा अध्यक्ष व विधानपरिषद उपसभापतींना महायुतीचे नेते भेटणार आहेत.

फॉर्म्युल्यावर एकमत

यापूर्वी महायुती समन्वय समितीच्या बैठका झाल्या आहेत. या बैठकांमध्ये नव्या फॉर्म्युल्यावर एकमत झाले आहे. नव्या फॉर्म्युल्यानुसार भाजपच्या वाट्याला 50 टक्के तर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या वाट्याला प्रत्येकी 25 टक्के याप्रमाणे महामंडळाचं वाटप होणार आहे.  विधीमंडळ समित्यांचे वाटप मात्र विधीमंडळ नियमानुसार होणार असून,  विधीमंडळ समित्यांच्या अध्यक्षांची नेमणूक पक्षीय बलाबलनुसार होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *