• Sat. May 3rd, 2025

मनसेनंतर काँग्रेसही आक्रमक; टोलमुक्त भारताचे काय झाले ? थोरातांचा सवाल

Byjantaadmin

Oct 9, 2023

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील टोल नाक्यांच्या मुद्द्यांवर आक्रमक भूमिका घेत राज्य सरकारला थेट इशारा दिला. तसेच शिवसेना-भाजप युतीने त्यांच्या जाहीरनाम्यात केलेल्या टोलमुक्त महाराष्ट्रची आठवणही त्यांनी करून दिली. यानंतर आता टोलमुक्तीच्या मुद्द्यांवरून काँग्रेसदेखील आक्रमक झाली आहे. त्यामुळे राज्यात टोलमुक्तीचा प्रश्न पेटण्याची शक्यता आहे.”टोलमुक्त भारताचे आश्वासन देऊन सत्तेत आलेल्या भाजपच्या काळात टोलवसुली वाढली आहे. भाजपला आपल्या घोषणेचा विसर पडला असून, राज्यातील जनता खड्ड्यांमधून प्रवास करत आहे”, अशी खोचक टीका काँग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजपवर केली.

BALASAHEB THORAT हे काँग्रेस पक्षाच्या उत्तर महाराष्ट्र आढावा बैठकीनिमित्त सोमवारी नाशिकच्या दौऱ्यावर होते. या वेळी ते बोलत होते. “नाशिक ते MUMBAI असा गाडीने प्रवास करताना अंगावर शहारे येतात. कल्याण, भिवंडीमध्ये तर तासन्-तास ट्रॅफिक जॅम असते. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. याविषयी मुख्यमंत्र्यांना विचारणा केली तर त्यांच्याकडे उत्तर नाही, मग टोलवसुली कशासाठी करता ?”, असा प्रश्न थोरातांनी उपस्थित केला.राज्यातील टोलवसुली सरकारने तत्काळ थांबवली पाहिजे. जनतेलाTOLL MUKT भारताचे स्वप्न दाखवून भाजप २०१४ मध्ये सत्तेत आले. गेल्या नऊ वर्षांत टोलमुक्त तर सोडाच; पण टोलवसुली जोरात सुरू झाली. आपण दिलेल्या आश्वासनांचा भाजपच्या नेत्यांनाच विसर पडलेला दिसतो”, असा टोलाही थोरातांनी लगावला.”राज्यातील रस्त्यांची इतकी बिकट अवस्था आहे की, प्रत्येक खड्ड्यातून प्रवास करताना भाजपची आठवण जनतेला यावी, यामुळेच आपल्याला असा प्रवास करावा लागत असल्याची जाणीव प्रत्येकाने ठेवायला हवी”, असंही थोरात म्हणाले.दरम्यान,  MNS नंतर टोलमुक्तीच्या मुद्द्यांवरून CONGRESS नेही सरकारला घेरलं आहे. त्यामुळे आता यावर राज्य सरकार काय भूमिका घेतं, हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *