राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार मोहम्मद फैजल यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. केरळ उच्च न्यायालयाने खासदार फैजल यांना खुनाच्या प्रयत्नाच्या आरोपाखाली ३ ऑक्टोबरला दोषी ठरवले होते. त्यामुळे लोकसभा सचिवालयाने त्यांचे लोकसभेतून निलंबन केले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी फैजल यांच्या शिक्षेला स्थगिती देत फैजल यांचे संसदेचे सदस्यत्व कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.MOHAMMAD FAIZAL हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या SHARAD PAWAR गटाचे लक्षद्वीपचे खासदार आहेत. फैजल यांना 2009 मधील एका खुनाच्या प्रकरणात दहा वर्षांची शिक्षा झाली होती. ही शिक्षा आधी सत्र न्यायालयाने ठोठावली होती. त्यानंतर हे प्रकरण KERAL HIGH COURT गेले होते. त्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती देत त्यांना दिलासा दिला आहे.
एकाच वर्षात दोनदा खासदारकी रद्द झाल्यामुळे मोहम्मद फैजल यांना मोठा धक्का बसला होता. दरम्यान, राष्ट्रवादीतील बंडानंतर पक्षात दोन गट निर्माण झाले. यानंतर अजित पवार गटाने पक्षावर दावा सांगितल्याने दोन गटांतील संघर्ष थेट निवडणूक आयोगात पोहाेचला आहे. यावर पहिली सुनावणीही झाली. आज पुन्हा एकदाELECTION COM.त सुनावणी होणार आहे. या सुनावणी आधी NCPया शरद पवार गटाला मोहम्मद फैजल यांची खासदारकी पुन्हा मिळाल्यामुळे दिलासा मिळाला आहे.