उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धादांत खोटं बोलत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. राज ठाकरेंनी आज पत्रकार परिषद घेतली. टोलचे पैसे कुठे आणि कोणाकडे जातात, असा प्रश्न विचारत टोल हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा झोल आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला. टोलवरून पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस सरकारवर राज ठाकरे यांनी तोफ डागली. विशेष म्हणजे या वेळी त्यांनी फडणवीसांचा एक व्हिडिओदेखील दाखवला.RAJ THAKRE म्हणाले, ‘दोन-तीन दिवसांपूर्वीच माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीसांनी दुचाकी, चारचाकी, शाळेच्या गाड्यांना टोल आकारला जात नाही,
केवळ व्यावसायिक वापराच्या वाहनांवरच टोल आकारला जात असल्याचे सांगितले होते; पण प्रत्यक्षात सर्वच वाहनांना टोल आकारला जातो. खऱ्या अर्थाने टोल हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा घोटाळा आहे आणि याची शहानिशा झालीच पाहिजे.मी दोन दिवसांत CM ना भेटणार आहे, त्यांच्याकडून काय उत्तर येतं ते पाहू,अन्यथा प्रत्येक टोल नाक्यावर MNS चे कार्यकर्ते उभे राहतील आणि वाहनांकडून टोल घेऊ दिला जाणार नाही. जर याला विरोध झाला तर हे टोल नाके आम्ही जाळून टाकू, पुढे सरकारला काय करायचे ते सरकारने करावे, असे आव्हानच त्यांनी राज्य सरकारला दिले.
टोल नाक्यांसाठी आंदोलने करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी अंगावर केसेस घेतल्या. वर हे सांगतात असं काही झालेच नाही, तर या केसेस काढून टाका. जर चारचाकीला टोल नाही, असे सरकार सांगत असेल, तर याचा अर्थ हे टोल नाके वाहनचालकांना लुटत आहेत. याचे उत्तर सरकारला द्यावेच लागेल. यासाठी मी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे, असेही राज ठाकरेंनी स्पष्ट केलं.