राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर पक्ष चिन्हाच्या वादावर शुक्रवारी निवडणूक आयोगात पहिली सुनावणी झाली. त्यानंतर सोमवारी पुन्हा निवडणूक आयोगात सुनावणीला सुरुवात झाली आहे. अजित पवार गटाचे वकील ॲड. निरज किशन कौल हे युक्तिवाद करत आहेत. या वेळी शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. “शरद पवारांनी सर्व नियम पायदळी तुडवले असून, ते आपल्या घराप्रमाणे पक्ष चालवत होते”, असा युक्तिवाद अजित पवार गटाकडून निवडणूक आयोगात कऱण्यात आला आहे.”राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अंतर्गत लोकशाही नसून पक्षावर कोणताही एक व्यक्ती दावा करू शकत नाही, सध्या पक्षामध्ये अशीच परिस्थिती असून, पक्षावर कोणतीही व्यक्ती वर्चस्व गाजवू शकत नाही”, असा युक्तिवाद अजित पवार गटाचे ADV NIRAJ KAUL यांनी केला आहे.