मुंबई : राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यावीर सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर भाजप आक्रमक झाली आहे. आज पुन्हा एकदा भाजप नेते आशिष शेलार यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच त्यांनी यावेळी ठाकरे गटावर देखील निशाणा साधला आहे. सावरकरांच्या बाबतीत जेवढं अपमानस्पद करता येतील तेवढं काँग्रेसनं केल्याचं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. राहुल गांधी हे जाणून बूजून सावरकरांचा अपमान करत आहेत. मात्र त्यांनी लक्षात ठेवावं हा सावरकरांचा नाहीतर हिंदुस्थानातील तमाम देशभक्तांचा अपमान आहे असं शेलार यांनी म्हटलं आहे. तसेच ठाकरे गट सत्तेसाठी माती खात असल्याचा टोलाही शेलार यांनी लगावला आहे.
आशिष शेलार यांनी राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. सावरकरांबद्दल जेवढं अपमानस्पद करता येतील तेवढं काँग्रेसनं केल्याचं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. राहुल गांधी जाणून बूजून सावरकरांचा अपमान करत आहेत. सावरकरांचा अपमान हा संपूर्ण देशभक्तांचा अपमान आहे. सावरकर हे महाराष्ट्राचे सुपूत्र होते. त्यामुळे हा अपमान महाराष्ट्राचा आहे. मराठी माणसांचा आहे. राहुल गांधी यांना मराठी माणूस कधीही माफ करणार नाही, असं शेलार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान याच प्रकरणावरून आशिष शेलार यांनी ठाकरे गटाला देखील टोला लगावला आहे. सावरकरांचा अपमान करणाऱ्या मणीशंकर अय्यर यांच्या प्रतिमेला बाळासाहेबांनी जोडे मारले होते. मात्र आज त्यांचे नातू त्यांच्या गळ्यात गळे घालून फिरत आहेत. ठाकरे गट सत्तेसाठी माती खात आहे. त्यांनी बोटचेपी भूमिका घतेली असल्याचं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.