• Fri. May 2nd, 2025

निलंगा नगरपरिषदच्या भोंगळ कारभाराविरुद्ध युवक काँग्रेसच्या वतीने धरणे आंदोलन

Byjantaadmin

Oct 9, 2023
निलंगा नगरपरिषदच्या भोंगळ कारभाराविरुद्ध युवक काँग्रेसच्या वतीने धरणे आंदोलन
निलंगा- निलंगा विधानसभा युवक काँग्रेस तालुका व शहर काँग्रेसच्या वतीने निलंगा नगरपरिषदच्या भोंगळ कारभारा विरोधात निलंगा विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमोल सोनकांबळे,तालुकाध्यक्ष मदन बिरादार,शहराध्यक्ष मुजीब सौदागर यांच्या नेतृत्वाखाली एकदिवसीय धरणे आंदोलन विविध मागणीसाठी करण्यात आले,यावेळी सध्याची पाणीटंचाई दूर करण्यासाठी शहरातील बंद केलेले इंधन बोअर तात्काळ चालू करावे,शहरात असलेले  हायमास सह पथदिवे चालू करावे,शहरातील जुन्या गावामधील रस्ते,नाले यांचे कामे सुरू करून सध्या डेंग्यूची साथ असल्याने त्यासाठी फवारणी करावी,अशा विविध मागण्याचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले.यावेळी युवक काँग्रेसचे पदाधिकारी अवैज शेख,सोहेल शेख,धनाजी चांदूरे,शब्दर कादरी,गिरीश पात्रे,अजय कांबळे,तुराब बागवान,बिलाल शेख,फैसल शेख,अभिजित उसनाळे,तुराब बागवान,हे उपस्थित होते.यावेळी युवक काँग्रेसच्या धरणे आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव अभय साळुंके,तालुकाध्यक्ष विजय पाटील,माजी नगराध्यक्ष हमीद शेख,अशोकराव पाटील मित्र मंडळाचे जिल्हाध्यक्ष प्रा.दयानंद चोपणे,माजी सभापती अजित माने,डॉक्टर सेलचे अध्यक्ष अरविंद भातांबरे,जिल्हाकाँग्रेसचे उपाध्यक्ष सुधाकर पाटील,कार्यध्यक्ष नारायण सोमवंशी,जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष गोविंद सुर्यवंशी,प्रदेश काँग्रेसचे सदस्य पंकज शेळके,गंगाधर चव्हाण,अपराजित मरगणे,गोविंद धुमाळ,सोपान धुमाळ,शरणापा मुळे,विलास मुगळे,विलास लोभे,राजकुमार कट्टे,संभाजी ब्रिगेडचे प्रमोद कदम,प्रमोद ढेरे,माधवराव पाटील, इ.नी सहभाग नोंदवला.यावेळी अनेक मान्यवर नेत्यांनी काँग्रेस व युवक काँग्रेसचे पदाधिकारी यांनी आपल्या विचारवाणीतून प्रशासनावर व लोकप्रतिनिधींनी केलेल्या भोंगळ कारभारा विरुद्ध आपले विचार व्यक्त केले.व प्रशासनाला गंभीर इशारा दिला.जर आठ दिवसात शहरातील इंधन बोअर चालू नाही केले,व विविध मागण्यां मान्य नाही केल्या तर आमरण उपोषणला बसण्याचा इशारा युवक काँग्रेसच्या वतीने देण्यात आला.
निवेदनावर निलंगा शहरातील युवक काँग्रेस व पदअधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *