महाराष्ट्र महाविद्यालय निलंगा येथे विज्ञान मंडळाचे उद्घाटन संपन्न
निलंगा : येथील महाराष्ट्र महाविद्यालय येथे विज्ञान विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या विज्ञान मंडळाच्या उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून प्रा. बी.बी. कुलकर्णी माजी गणित विभाग प्रमुख, एन एस बी कॉलेज नांदेड हे उपस्थित होते. महाराष्ट्रातील विविध शास्त्रज्ञांचा विज्ञानातील संशोधनामधील योगदानावर प्राध्यापक कुलकर्णींनी प्रकाश टाकला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. वाय.पी. सारणीकर, रसायनशास्त्र विभाग, दयानंद विज्ञान महाविद्यालय, लातूर यांनी स्पष्ट केली की संशोधन कार्य करण्यासाठी आपली फक्त मानसिकता आवश्यक असते परिस्थिती हे कारण असुच शकत नाही. तसेच डॉ. सारणीकर यांनी भारतातील विविध संशोधन संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी आवश्यक असणाऱ्या स्पर्धा परीक्षा बद्दल सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम. एन. कोलपुके यांनी विद्यार्थ्यांमध्ये आवश्यक असणाऱ्या वैज्ञानिक दृष्टिकोनाचे महत्त्व सविस्तरपणे विशद केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विज्ञान मंडळाचे समन्वयक डॉ. एस.पी. बसुदे यांनी केले. डॉ. बसुदे यांनी सांगितले की, दि. 21/09/2023 रोजी विज्ञान मंडळातर्फे द ग्रेट सायंटिस्ट या विषयावर वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेमध्ये एकूण 19 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. परीक्षकांनी दिलेल्या निकालानुसार नऊ विद्यार्थ्यांची निवड खालील प्रकारे करण्यात आली. अध्यक्ष- रेवते प्रियंका, उपाध्यक्ष-आफताब पटेल, सचिव- स्नेहा पांचाळ, सदस्य-अक्षता सिंग,गुमटे निकिता,रत्नशील सोनकांबळे,कठारकर साक्षी,मासुलदार सानिया,तांभाळे प्रणिता. या कार्यक्रमाप्रसंगी विज्ञान विभागातील सर्व विभाग प्रमुख,प्राध्यापक, IQAC चे सह समन्वयक डॉ एन . व्हि. पिनमकर, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून रसायनशास्त्र विभागाअंतर्गत प्रा. एस.जी. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनानाखाली भितीपत्रक स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेमध्ये एकूण 63 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. गुमटे निकिता,रत्नशील सोनकांबळे या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर आभार प्रा. आर.एन.हिरेमठ यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विज्ञान विभागातील सर्व प्राध्यापक,विद्यार्थी, कर्मचारी वाकळे व खांडेकर तसेच सिद्धेश्वर कुंभार यांचे सहकार्य लाभले.