प्रामाणिक सैनिकाची फौज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांसोबत आहे तर गद्दार खंडोजी खोपडे ची औलाद भाजपाच्या कळपात आहे __शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजी माने यांचे प्रतिपादन
निलंगा(प्रतिनिधी):-शिवसेना वतीने होऊ द्या चर्चा हे अभियान भूत मुगळी तालुका निलंगा जिल्हा लातूर येथे पार पडले. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने साहेब म्हणाले की सत्तेसाठी हापापलेल्या भाजपाने गद्दार एकनाथ शिंदे सोबत फुटून गेलेले चाळीस आमदार आपल्या दावणीला बांधले. फुटून गेलेल्या गद्दारानी शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांचा विश्वासघात करून सत्तेचा मलिदा चाटण्यासाठी आपले पाप झाकण्यासाठी आपले बाप बदलले. परंतु या महाराष्ट्रामध्ये प्रामाणिक कार्यकर्त्याची फौज शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांसोबत आहे. निश्चितच गेलेल्या गद्दारांना काढून भारतीय जनता पार्टीच्या मनसुब्यावर पाणी सोडून महाराष्ट्राचा स्वाभिमान जागृत ठेवून या महाराष्ट्रा मधून भारतीय जनता पार्टीला त्यांची खरी जागा दाखवून देतील. शिवसैनिक रक्ताचं पाणी करून उद्धव साहेबांना समाधान लाभो यासाठी नाही तर उद्धव साहेबांना शंभर टक्के खात्री पटली पाहिजे शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीतला शिवसैनिक फक्त आणि फक्त जगतोय शिवसेनेसाठी मरणार शिवसेनेसाठी हे पटलं पाहिजे. आणि याच धर्तीवर महाराष्ट्रामध्ये जातीपातीच्या भिंती तोडून सर्व जाती धर्माचे लोक डॉक्टर, इंजिनियर वकील, शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार, कामगार ,महिला हे सर्वजण पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब सोबत आहोत .हा विश्वास देत आहेत या गोष्टीचा सार्थ अभिमान मला वाटतोय. हीच तर विचाराची शिदोरी शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांना आशेचा किरण दाखवणारी आहे. आणि निश्चितच पक्षप्रमुख आदरणीय उद्धव ठाकरे साहेब या देशाला दिशादर्शक राजकारण करतील I N D I A मजबूत करून या देशातून खोटारड्या भाजपाला सत्तेतूनच नाही तर राजकारणातून सुद्धा हद्दपार करतील यात शंका नाही. होय आपल्या मतदारसंघातून निश्चित स्वरूपांना शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी शब्द दिलेला आहे औसा विधानसभा मतदारसंघ शिवसेनाच लढवणार आहे .परंतु आपली बांधणी त्या पद्धतीची झाली पाहिजे त्याशिवाय लोकांचे प्रश्न उचला शेतकऱ्यांना धीर द्या शेतमजूर सुशिक्षित बेरोजगारांना धीर द्या यांच्यासोबत शिवसेना आहे हे दाखवण्यासाठी नाही तर शंभर टक्के तुम्ही यांच्यासोबत रहा असा आदेश पक्षप्रमुखांनी दिलेला आहे. म्हणून आम्ही सर्व शिवसेनेचे पदाधिकारी गावोगाव जाऊन भारतीय जनता पार्टीचा मींदे गटाचा भांडाफोड करून शिवसेना पक्षप्रमुखांचे विचार जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहोत घेणारच. आणि उद्धव साहेबांचा खांदा मजबूत करणार परंतु आपणही संभाव्य धोके सर्व ओळखून या खोटारड्या भारतीय जनता पार्टीला या गद्दार गटाला नेस्तनाबूत कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो तसेच शिवसेनेचे शिवाजीराव चव्हाण यांचा आज वाढदिवस या वाढदिवसाच्या प्रसंगी शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वतीने लातूर जिल्ह्याच्या वतीने तमाम शिवसैनिकाच्या वतीने शिवाजी चव्हाण यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा देतो. असे शिवाजी माने म्हणाले याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांच्या सोबत सह संपर्कप्रमुख संतोष सोमवंशी शिव सहकार सेनेचे विनोद आर्य शिवसेना उपजिल्हाप्रमुख हरिभाऊ सगरे युवा सेनेचे दिनेश जावळे शिवाजी पांढरे बालाजी माने अशोक सूर्यवंशी अशोक जाधव दत्ताभाऊ बसपुरे चंद्रहंस नलमले तुकाराम माने महिला आघाडीच्या सविताताई पांढरे रेखाताई पुजारी अरुणाताई माने सर्व पदाधिकारी व भूतमुगळी या गावातील ग्रामस्थ महिला उपस्थित होते.