कामगार कल्याण भवन, लातूर येथे महिला नाट्य महोस्तव संपन्न
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, कामगार कल्याण भवन, लातूर येथे गट स्तरीय महिला नाट्य महोस्तव दि. २९.०९.२०२३ रोजी संपन्न झाला. सदर स्पर्धेत एकूण आठ संघांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचे पारितोषिक
वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. डॉ. हनुमंत किणीकर, सहयाद्री हॉस्पिटल, लातूर, प्रमुख पाहुणे म्हणून बाळकृष्ण धायगुडे, जेष्ठ रंगकर्मी हे होते तर विशेष उपस्थिती म्हणून बालाजी पांचाळ हे उपस्थित होते. या स्पर्धेचे परीक्षण सौ. हिरा वेदपाठक, सौ. चेतना काळेगोरे व कु. वैष्णवी वाघ यांनी केले. सदर स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आर्टफिसिअल इंटीलीजेंट, दुसरा क्रमांक ती व तृतीय क्रमांक पांडुरंग विठ्ठला धाव घे रे विठ्ठला यांनी मिळवला. या स्पर्धेचे प्रस्ताविक कामगार कल्याण अधिकारी प्रसाद धस यांनी केले तर सूत्रसंचालन एस. के. जिरगे यांनी केले व आभार सलीम पठाण यांनी मानले. या कार्यक्रमाला नितीन पाटील, आरेफ शेख, विजय वायाळ व केंद्र सेवक चंद्रकांत माने, बालाजी पतंगे यांनी परिश्रम घेतले.
कामगार कल्याण भवन, लातूर येथे महिला नाट्य महोस्तव संपन्न
