राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर पक्षात दोन गट निर्माण होत दोन्ही गटातील संघर्ष थेट निवडणूक आयोगात गेला. निवडणूक आयोगात यावर शुक्रवारी सुनावणी देखील झाली. यावेळी दोन्ही गटाकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला. आता पुढची सुनावणी येत्या सोमवारी दुपारी चार वाजता होणार आहे. या पार्श्वभूमीवरच बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी मोदी-शाहांवर निशाणा साधला. “दिल्लीच्या अदृष्य शक्तीमुळे महाराष्ट्राची प्रगती नव्हे अधोगती झाली”, असा शाब्दिक हल्ला त्यांनी केला.”सुसंस्कृत विचाराने पुढे जाणारे पूर्वीचे भाजपचे नेते आणि आत्ताच्या भाजप नेत्यांमध्ये पूर्ण विरोधाभास आहे. या भाजपला आगामी लोकसभेच्या निवडणुकीत जनता नाकारणार आहे. दिल्लीचे अदृष्य हात महाराष्ट्रासह अनेक राज्यात फोडाफोडीचे राजकारण करत आहेत. त्यामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि पवारसाहेबांचा राष्ट्रवादी पक्ष बळी पडला. मात्र, आम्ही ‘इंडिया’वाले भाजपच्याविरुद्ध लढणार आणि जिंकरणार देखील”, असा निर्धार खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला. त्या शुक्रवारी माळेगाव (ता.बारामती) येथे माध्यमांशी बोलत ncp च्या निवडणूक आयोगातील सुनावणी आगोदरच आम्हाला चिन्ह व पक्ष मिळणार असे आमच्यातून निघून गेलेले नेते मंडळी बोलून दाखवितात. त्यामुळेच पवारसाहेबांच्या राष्ट्रवादी पक्षाने स्वतंत्रपणे सुप्रिम कार्टात आमच्यातून बाजूला गेलेल्यांविरुद्ध अपिल केले आहे”, असे त्या म्हणाल्या.”bjp ची रणनिती ही संविधान टिकण्याच्या दृष्टीने धोकादायक असून bjp चे नेते दिल्लीत एक आणि राज्यात एक अशी भूमिका घेत आहेत. मराठा, धनगर अरक्षणाचे मुद्दे मागे राहिले. महिला विधायक मंजूर करून महिलांना बेरर चेक दाखविला खरा, पण त्या चेकवर दिनांक टाकली नाही. त्यामुळे दिल्ली वगळता देशात कोठेही महिलांकडून या मंजूर विधायकाबाबत स्वागत अथवा जल्लोश झाला नाही, असंही त्या म्हणाल्या.
बारामती लोकसभा लढणार आणि जिंकणार…
baramati loksabha मतदारसंघाबाबत प्रश्न विचारण्यात आला असता, त्या म्हणाल्या, “बारामती लोकसभा मतदारसंघात गेली १५ वर्षे प्रमाणिक काम केले. या मतदारसंघाने मला संसदेमध्ये पाठविल्य़ानंतर इतके चांगले काम केले. आजवर या मतदारसंघात प्रत्येक आमदाराला विश्वासात घेऊन आणि प्रोटोकाल धरून काम केले. त्यामुळे लोकांमध्ये माझे विश्वासाचे नाते तयार झाले आहे. येत्या काळात पुरंदरच्या विमानतळाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करणार असून या कामाच्या जोरावर बारामती लोकसभा लढणार आणि जिंकणारही”, असा निर्धार सुळे यांनी व्यक्त केला.