हमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात पाझर तलावात कपडे धुण्यासाठी गेलेल्या तीन भावंडांचा बुडून मृत्यू झाला. त्यांना वाचवण्यासाठी आईने तलावात उडी मारली पण…
अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील खर्डा गावात मन हेलावून सोडणारी एक घटना उघडकीस आली आहे. खर्डा जवळील अंतरवाली येथील पाझर तलावावर पडे धुण्यासाठी गेलेल्या तीन भावंडांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. मुलांना बुडतांना पाहून आईने तलावात उडली मारली पण तिला मुलांना वाचवता आले नाही. आईला, रस्त्यावरून जाणाऱ्या काही नागरिकांनी वाचवले. ही घटना गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास घडली.कृष्णा परमेश्वर सुरवसे, दीपक ज्ञानेश्वर सुरवसे, सानिया ज्ञानेश्वर सुरवसे अशी मृत भावंडांची नवे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार ही भावंडे त्यांच्या आई सोबत कपडे धुण्यासाठी पाझर तलावाकडे जात होती. कपडे धुवत असताना सानिया हीचा पाय घसरून ती तलावात पडली. ती बुडू लागल्याने तिला वाचवण्यासाठी दीपक, कृष्णा हे देखील पाण्यात उतरले. मात्र, ते देखील बुडायला लागले.ही घटना आईच्या लक्षात येताच तिने देखील त्यांना वाचवण्यासाठी तलावात उडली मारली. पण ती देखील पाण्यात बुडू लागली. त्याचवेळी येथून जाणाऱ्या काही नागरिकांनी त्यांना वाचविण्यासाठी धावले. त्यांनी बुडत असलेल्या आईला पाण्याबाहेर काढले. मात्र मुलांना मुलांना वाचवण्यात त्यांना अपयश आले.
दीपक आणि सानिया हे दोघे सख्खे बहिण भाऊ होते. तर कृष्ण हा त्यांचा चुलत भाऊ आहे. कृष्णा, दीपक हे इयत्ता दहावीत तर सानिया आठवीत शिकत होती. या मुलांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे कुटुंबासह गावावर शोककळा पसरली आहे. या तिघांचे एकाच वेळी एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.