ज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्रफडणवीस यांच्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांचा ई-मेल हॅक करत महावितरण अधिकाऱ्यांचे बनावट बदली आदेश काढल्याचा धक्कादायक प्रकार राज्य सायबर विभागाच्या कारवाईत समोर आला. सायबर विभागाने याप्रकरणी मोहंमद इलियास याकूबमोमीन (४०) याला मिरजमधून अटक केली. मूळचा मिरजचा रहिवासी असलेला इलियासहा बीई इलेक्ट्रिकल इंजिनिअर असून त्याने हेकृत्य एकट्याने केले असावे, असा अंदाज आहे.फडणवीस यांचे विशेष कार्यकारी अधिकारी विद्याधर महाले यांच्या नावाचा गैरवापर करूनई-मेल आयडी हॅक करून बनावट आदेश त्याने काढले. माहितीनुसार सुमारे ६ अधिकाऱ्यांचे बनावट आदेश काढण्यात आलेले होते. विद्याधर महाले यांच्याई-मेलवरून बदली संदर्भातील सूचना दिल्या गेल्या.
त्यानंतर आदेश काढण्यात आल्याचे स्पष्ट झाले. आरोपी बनावट आदेशामार्फत पैसे उकळत होता. यामध्ये नेमका किती व्यवहार झाला आहेे, किती जणांचा सहभाग आहे, याबाबत चौकशी सुरू आहे.आरोपी मोमीनने बनावट पद्धतीने काढलेल्या बदली आदेशावर गृहमंत्री आणि ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांची सही कॉपी-पेस्ट केल्याचेही समोर आले.