• Wed. Apr 30th, 2025

अजितदादा मुख्यमंत्री झाल्यास पहिला हार घालायची संधी द्या; सुप्रिया सुळे

Byjantaadmin

Oct 6, 2023

अजित पवार यांना मुख्यमंत्री करायचंच ठरलं तर त्यांना पाच वर्षासाठी आम्ही मुख्यमंत्री करू, असं जाहीर विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. फडणवीस यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात तर्कवितर्क व्यक्त केले जात आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांनी तर अजितदादा मुख्यमंत्री झाल्यास त्यांना पहिला हार घालण्याची संधी मला द्या, अशी विनंतीच देवेंद्र फडणवीस यांना केली आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. तसेच सुप्रिया सुळे यांच्या या विधानाचेही राजकीय अर्थ काढले जात आहेत.

सुप्रिया सुळे या बारामती दौऱ्यावर होत्या. माळेगावमध्ये पत्रकार कट्ट्यावर गप्पा मारताना त्यांनी हे आश्चर्यकारक विधान केलं. अजितदादांना आम्ही पाच वर्षासाठी मुख्यमंत्री करू, असं फडणवीस म्हणाल्याचं त्यांच्या निदर्शनास आणून दिलं. त्यावर त्यांनी मार्मिक टोलेबाजी केली. मी देवेंद्रजींचे आभार मानते. अजितदादा मुख्यमंत्री झाल्यावर त्यांना पहिला हार घालायची संधी मला मिळावी ही विनंती करते. भाजप एवढा त्याग करु शकते हे विशेष. काँग्रेस विचारांचे मुख्यमंत्री तुम्हाला चालतात हे नवल. भाजपचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे, असा खोचक टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला.

दिल्ली के सामने झुकेंगे नहीं

पक्ष चिन्ह आणि पक्षाच्या ताब्यावरून त्यांनी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्यावरही त्यांनी टीका केली. एक गृहस्थ म्हणाले पक्ष आणि चिन्ह आम्हालाच मिळेल. एक तर पेपर फुटला असेल किंवा अदृश्य शक्तीचा यामागे हात आहे. राष्ट्रवादीची एक विचारधारा. इथे लोकशाही आहे. दडपशाही नाही. शरद पवार यांनी पक्ष स्थापन केला. ते सोबत येत नाहीत म्हणून तुम्ही घर फोडता, पक्ष फोडता. आम्ही संघर्ष करत राहू. दिल्ली के सामने झुकेंगे नहीं, असं त्यांनी ठणकावून सांगितलं

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed