महाराष्ट्र महाविद्यालयात वन्यजीव सप्ताहनिमित्त जागरुकता शिबिर संपन्न
निलंगा: येथील महाराष्ट्र महाविद्यालयाच्या प्राणिशास्त्र विभाग व वनविभाग निलंगा यांच्या संयुक्त विद्यमाने वन्यजीव सप्ताहनिमित्त जागरुकता शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरासाठी प्रमुख पाहुणे म्हणून वन अधिकारी श्री सोपान बडगने हे उपस्थित होते. त्यांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अन्नसाखळी टिकवून ठेवण्यासाठी वन्यजीव प्राण्यांचे महत्व अधिक आहे. हे वन्यजीव प्राणी आजच्या आधुनिकीकरणाच्या काळात टिकवून ठेवणे हे आजच्या पिढीसमोरचे महत्वाचे कार्य आहे. वन्यजीवांचे सुरक्षिततेसाठी प्रदुषण टाळले पाहीजे व पर्यावरणाचे संवर्धन करण्याची गरज त्यांनी यावेळी प्रतीपादन केली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव कोलपुके हे उपस्थित होते, त्यांनी याप्रसंगी वन्यजीव प्राण्यांचे मानवी जीवनासाठी असलेले महत्व प्रतीपादन केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पक्षी अभ्यासक तथा आयक्युएसीचे समन्वयक डॉ ज्ञानेश्वर चौधरी यांनी केले. तर सुत्रसंचलन डॉ. सचीन बसुदे यांनी केले, तर कार्यक्रमाचे आभार प्राणिशास्त्र विभाग प्रमुख डॉ. धनंजय जाधव यांनी मानले.तर कार्यक्रमाचे संचलन डौ. सचीन बसुदे यांनी केले. वन्यजीव सप्ताहनिमित्त महाविद्यालय परीसरात रासेयो व वनविभागाच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. सुभाष बेंजलवार, डॉ. विठ्ठल सांडूर, प्रा. सुरेश कुलकर्णी, डौ. भास्कर गायकवाड, डौ. बालाजी गायकवाड, प्रा. गोविंद शेंडगे, प्रा. रेश्मा चौधरी. इत्यादिंची उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी श्री आजम शेख, श्री गणेश वाकळे, श्री विष्णू मुळे, सावता दापके, वनविभागाचे कर्मचारी श्री तेलंग, श्री कोकरे इत्यादिंनी परीश्रम घेतले.