निलंगा:-साई क्रिटिकेअर हॉस्पिटल निलंगा तर्फे सावरी येथे मोफत मधुमेह रक्तदाब नेत्ररोग तपासणी व चष्मे वाटप शिबिर ठेवण्यात आले होते या शिबिरामध्ये चार गावचा सहभाग होता,सावरी ,चन्नाचीवाडी ,कोयाजीवाडी ,सगारेड्डीवाडी या गावातील गावकऱ्यांनी भरपूर प्रतिसाद दिला यामध्ये डॉ.अरविंद भातांब्रे यांनी गावकऱ्याना मधुमेह व रक्तदाब या विषयावर संबोधित केले,या शिबिरामध्ये 311रुग्णांनी सहभाग नोंदवला.त्या मध्ये 22मोतीबिंदू रुग्णांची नोंदणी झाली व 43 रूग्णांना चष्मे लागले. सावरी गावातील ग्रामस्थांनी मा.श्री.डॉ.अरविंद भातांब्रे , चक्रधर शेळके , अजित माने, डॉ.स्नेहा कांबळे व या शिबिरातील सर्व स्टापचा सत्कार केला.
शिबिरामध्ये तज्ञ डॉ.अरविंद भातांब्रे डॉ.स्नेहा कांबळे, राहुल गावकरे, ज्योती पाटील,गणेश सूर्यवंशी,विशाल फुलारी यांनी गावकऱ्यांची सेवा केली . आज पर्यंत डॉक्टर अरविंद भातांब्रे यांच्याकडून पाच हजार चष्म्याचे वाटप झाले आहे त्याचबरोबर वेगवेगळ्या योजना शिबिरे पार पडत असताना हॉस्पिटलच्या माध्यमातून 75 वर्षांपुढील रुग्णांना मोफत दवाखाना आहे .आणि महिलांना मोफत तपासणी करण्यात आली आहे. या वेळी सचिन जाधव,धनंजय(बंडू)पाटील, दत्ता सगरे,ओम महाराज,प्रमोद सगरे,बालाजी कदम,राम सगरे,सचिन सगरे,रजनीकांत सगरे व गावकरी उपस्थित होते
साई क्रिटिकेअर हॉस्पिटल निलंगा तर्फे सावरी येथे मोफत मधुमेह रक्तदाब नेत्ररोग तपासणी व चष्मे वाटप शिबिर संपन्न
