भाजपाला राज्यातूनच नव्हे तर देशातून हद्दपार करायचे आहे-शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजी माने
औसा:- चर्चेचे अभियान मातोळा तालुका औसा येथे संपन्न झाले होऊद्या चर्चेमध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने म्हणाले की शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला होता उसाची झोनबंदी शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार तत्कालीन शिवशाही सरकारने उठवले होते.
आता पुन्हा एकदा शेतकऱ्यावर आत्महत्येची वेळ कशी येईल असे षडयंत्र केंद्र व राज्य शासनाकडून आखले जात आहे. सोयाबीनला भाव नाही, कांद्याला भाव नाही, टमाट्याला भाव नाही शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव नाही परंतु शेतकऱ्यांना लागणारे खत बियाणे औषध यांचे मात्र भाव गगनाला भिडलेले आहेत. याच भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी पाशा पाटलाच्या नेतृत्वाखाली संभाजी पाटील इतर भाजपाची लोक शेतकऱ्याला भाव मिळत नाही म्हणून पायी दिंडी काढले होते .त्या दिंडीमध्ये शेतकऱ्याला किमान सहा हजार भाव मिळाला पाहिजे ते दहा वर्षांपूर्वी सांगत होते दहा वर्षांपूर्वी जर सहा हजार भाव हवा होता तर मग आज राज्यात आणि केंद्रात भारतीय जनता पार्टीचे सरकार असून सुद्धा शेतकऱ्याला न्याय देण्याची भूमिका या शासनाची भाजपवाल्याची नाही. आजही शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र सुरू असून शेतकरी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत आहे. दिलेल्या घोषणाचा विसर भाजपवाल्याला पडलेला आहे बोल घेवडा पणा करून पन्नास खोकेच्या मदतीने गद्दार ओके झाले.आश्या लोकांना हाताशी धरून राज्यात सत्ता मिळवली परंतु राज्यातली जनता हे सगळं ओळखून आहे. आजही जगाचा पोशिंदा उपवांशी आहे. शेतकरी असेल शेतमजूर असेल सुशिक्षित बेरोजगार असेल कामगार असेल व्यापारी असेल सगळीच लोक या भाजपवाल्यावर चिडलेली आहेत. घोषणाचा पाऊस कर्तुत्वाचा दुष्काळ अंमलबजावणी शून्य आहे .जगाचा पोशिंदा उपाशी झोपतोय लेकरा बाळाच्या शिक्षणाचा खर्च करू शकत नाही अशा परिस्थितीमध्ये जीवन जगत असताना सत्ता स्थानी असलेले दोन्ही सरकार केंद्रात नं राज्याचं हे भाजपाचे असताना नऊ वर्षात एकही केलेली घोषणा पूर्ण करू शकले नाही. हे बोल घेवडेपणाचे सरकार सर्वसामान्याशी देणं घेणं नाही या पद्धतीने वागत आहे. सत्ता मिळवण्यासाठी बरेच जुमले केले वर्षाकाठी दोन करोड नोकऱ्या देणार सरकार महाराष्ट्रातल्या तरुणांच्या हातात आलेला रोजगार हिसकावून घेऊन सर्वसामान्यांच्या ताटात माती कालवण्याचे काम करत आहेत. महाराष्ट्रातले मोठे उद्योग गुजरातला नेले जेवढे काही महाराष्ट्राला लुटता येईल तेवढे लुटलं तरी यांचा समाधान झालेलं नाही, यांना पुन्हा एकदा या देशात सत्ता पाहिजे या महाराष्ट्रात सत्ता पाहिजे मुंबई महानगरपालिका ताब्यात पाहिजे मुंबई महानगरपालिकेमध्ये असलेले 90 हजार कोटीची ठेव यांच्या डोळ्यात आहे परंतु महाराष्ट्रातील जनता हा सगळा डाव ओळखून आहे आणि हे षडयंत्र निश्चितच महाराष्ट्रातील जनता हाणून पडेल असा आत्मविश्वास मला वाटतो असे शिवाजी माने म्हणाले
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी उपतालुकाप्रमुख श्रीराम कुलकर्णी विभाग प्रमुख अजित भोसले मातोळ्याची शाखाप्रमुख सर्व शिवसैनिक यांनी परिश्रम घेतले तरी याप्रसंगी तालुकाप्रमुख तानाजी सुरवसे युवती सेनाधिकारी श्रद्धा जवळगेकर उपतालुकाप्रमुख आबा पवार साळुंखे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते