धर्मनिरपेक्षवादी विचारसाठी अशोकराव पाटील मित्र मंडळ,तुपडी येथे शाखा स्थापना
निलंगा-निलंगा तालुक्यातील तुपडी येथे अशोकराव पाटील मित्र मंडळाची शाखा स्थापना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.यावेळी मित्र मंडळाचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक दयानंद चोपणे,संगायो सदस्य सुरेंद्र धुमाळ,निलंगा काँग्रेस अल्पसंख्याक अध्यक्ष लाला पटेल, निलंगा तालुका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष सोनाजी कदम,निलंगा विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमोल सोनकांबळे,शेंदचे सरपंच रमेश मोगरगे,मानवधिकार विधी सेलचे अध्यक्ष,ग्राहक सेलचे अध्यक्ष भरत बियानी,प्रमोद ढेरे नगरसेवक सुधीर लखनगावे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला यावेळी अशोकराव पाटील निलंगेकर म्हणाले की, आज तुपडी येथे शाखा पुनर्जीवित करण्याचा हेतू हा की,ज्या पद्धतीने आरएसएस देशात जातिवाद निर्माण करतो तर मित्र मंडळ हे धर्मनिरपेक्षवादी विचार निर्माण करतो देशाला संविधान महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिले ते संविधान सांभाळण्याचे काम मित्र मंडळाचे सदस्य करतील या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये काँग्रेस पक्षाचा सिंहाचा वाटा असून महात्मा गांधी,पं.जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी पासून ते सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे यांनी सर्वधर्मसमभाव ही विचारधारा रुजवली व ती पुढे जतन करण्यासाठी स्व.डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब,स्व.विलासराव देशमुख साहेब शिवराज पाटील चाकूरकर साहेब यांनी आम्हा सर्वांना मार्गदर्शन करून प्रेरणा दिली. याची आठवण आता येणाऱ्या नव्या पिढीला आणि कृती केली पाहिजे तरच आपण स्वाभिमानाने जगू शकतो. आताच्या राजकारणाचे माणसे आर्थिक कारणाने उध्वस्त होत आहेत त्यासाठी गल्ली ते दिल्ली पर्यंत परिवर्तन झाले पाहिजे तरच आपण जगू शकतो असे ते म्हणाले यावेळी हाडगाचे धनराज वाघमारे,व्यंकटराव शिंदे, बबलू जाधव,बाबर पठाण,सोशल मीडियाचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर वाडीकर,सोहेल शेख,उपसरपंच शहणू मुजावर,तंटामुक्तीचे अंकुश जाधव,अध्यक्ष राजू येळकर,चेअरमन उमराव जाधव,विठ्ठलराव जाधव,यादव भुरे,ग्रा.सदस्य धनाजी वजीरे,अर्जुन कांबळे,अंगद पिटले,सिराज मुजावर,मेहबूब मुजावर,मंगेश येळकर,खयूम मुजावर,मंगेश येळकर,बालम मुजावर,अस्लम शेख,प्रशांत येळकर,स्वरूप येळकर,सहदेव भोसले,अतुल भुरे,सद्दाम पटेल,माधव पाटील,शेषेराव वजीरे,व सर्व ग्रामस्थ,महिला वर्ग,युवक मोठया संख्येने उपस्थितीत होते.आणि या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत येळकर यांनी तर आभार स्वरूप येळकर यांनी केले.