विद्यापीठाच्या कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र महाविद्यालय निलंगा यांना दुहेरी यश
निलंगा:-स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व महाराष्ट्र महाविद्यालय निलंगा यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या कबड्डी स्पर्धेमध्ये महाराष्ट्र महाविद्यालय निलंगा येथील मुलींचा संघ अजिंक्य ठरला आहे तर मुलांच्या संघास उपविजेतेपद मिळाले आहे. या कबड्डी स्पर्धेसाठी मुलांचे 12 संघ तर मुलींचे आठ संघ सहभागी झाले होते.प्रो कबड्डीच्या धरतीवर अत्याधुनिक कबड्डी मॅटवर दोन मैदान महाविद्यालयाच्या इंनडोर हॉलमध्ये तयार करण्यात आले होते. संघामध्ये यशोदा पाटील, धुमाळ शितल, माळी आरती,सोनल जाधव, या खेळाडूंनी चौफेर खेळ खेळला व महाविद्यालयास विजेतेपद प्राप्त केले. तर मुलांच्या संघांमध्ये रोमान तांबोळी, कृष्णा कांबळे, कुलकर्णी कृष्णा, ओंकार बिराजदार या खेळाडूंनी अष्टपैलू खेळ केला, तसेच लातूर येथे झालेल्या बास्केटबॉल स्पर्धेमध्ये मुलांचा तृतीय क्रमांक आला व बॅडमिंटनमध्ये सुद्धा महाराष्ट्र महाविद्यालय ,निलंगा तृतीय क्रमांक प्राप्त केला. यामध्ये गौरव पांचाळ याने चांगला खेळ केला.या सर्व विद्यार्थ्यांना क्रीडा विभाग प्रमुख प्रा.डॉ.गोपाळ मोघे यांचे मार्गदर्शन लाभले. खेळाडूंच्या या यशाबद्दल महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष माननीय विजयजी पाटील निलंगेकर साहेब, प्राचार्य डॉक्टर माधव कोलपुके, डॉक्टर धनंजय जाधव, डॉक्टर चंद्रकुमार कदम यांच्या उपस्थितीत खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. यामधून सेंट्रल झोनसाठी महाविद्यालयाच्या कबड्डी मुले- मुली पाच, पाच खेळाडूंची निवड विभागीय स्पर्धेसाठी झालेली आहे .तसेच योगासना स्पर्धेमध्ये वैभव पांचाळ ,अथलेटिक स्पर्धेमध्ये पंधराशे मीटर धावणे यामध्ये गीता वाडकर व कांबळे सीमा पाच किलोमीटर धावणे या मुलींची निवड विभागीय स्पर्धेसाठी झालेली आहे खेळाडूंच्या या यशाबद्दल खेळाडूंचे सर्वत्र अभिनंदन होत आहे