साई क्रिटी केअर हॉस्पिटल च्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त आज मोफत आरोग्य, नेत्र तपासणी शिबिर संपन्न.
निलंगा प्रतिनिधी:-आज निलंगा येथे हॉस्पिटलच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त आरोग्य शिबिर,नेत्र शिबीर,संपन्न झाले या शिबिराचे उद्घाटक म्हणून अशोकराव पाटील निलंगेकर होते. तसेच प्रमुख पाहुणे अभय साळुंखे,अजित माने,चक्रधर शेळके, सोनू दगवाले,हमिद शेख,प्रल्हाद बाहेती,लाला पटेल,सुधाकर पाटील,अजित नाईकवाडे,दयानंद चोपणे,नारायण सोमवंशी, प्रमोद कदम,अंबादास जाधव,गोविंद सूर्यवंशी, अमोल सोनकांबळे, अजगर अन्सारी,मोहन भंडारे, रमेश लांबोटे,विलास लोभे,महेश देशमुख,रजनीकांत कांबळे, नुर पटेल, धम्मानंद काळे,आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी दोन वर्षेपूर्ती होऊन चांगली सेवा रुग्णांना पुरवण्याचे कार्य डॉ.भातंबरे यांच्याकडून झालेली आहे. आज पर्यंत डॉक्टर अरविंद भातंबरे यांच्याकडून पाच हजार चष्म्याचे वाटप झालेले आहे त्याचबरोबर वेगवेगळ्या योजना शिबिरे पार पडत असताना हॉस्पिटलच्या माध्यमातून 75 वर्षांपुढील रुग्णांना मोफत दवाखाना होता. आजपासून सरसकट महिलांना मोफत तपासणी करण्याचे जाहीर करण्यात आले आहे. या शिबिरात १०२४रुग्ण तपासणी, ६३५नेत्र तपासणी, ४५८रुग्णांना चष्मे वाटप होणार.
अशोक पाटील निलंगेकर, डॉ अरविंद भातंब्रे,अजित माने, चक्रधर शेळके आदींनी या वर्धापन दिनानिमित्त आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.अरविंद भातंबरे,डॉ.राजशेखर
मेनगुले, डॉ.संदीप जाधव,डॉ.स्नेहा कांबळे,डॉ शिवकन्या यादव, डॉ.रुपाली आग्रे , हॉस्पिटलच्या सर्व सदस्यांनी या कार्यक्रमाच्य यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. सूत्रसंचालन विलास लोभे यांनी केले तर आभार दयानंद चोपणे यांनी मानले