निलंगा नगरपरिषदेच्या पिण्याच्या पाईपलाईनचे पितळ उघडे,बोगस कामाची चौकशी करा- अशोकराव पाटील निलंगेकर
निलंगा- निलंगा शहरातील हाडगा नाक्यापासून ते मुगाव पाटीपर्यंत सुरू असलेल्या साईडपट्टीचे काम चालू असून या कामावर असलेल्या गुत्तेदाराचे सहकारी असलेले अरेरावी भाषा वापरून नागरिकांच्या अंगावर रोडरोलर घालत असल्याची माहिती मिळताच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर यांनी चालू असलेल्या कामाला भेट दिली असता शहरात पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन ही अत्यंत हलक्या दर्जाची असून सदरील पाईप 3 ते 4 फूट खाली घालण्याऐवजी 1 फुटामध्ये वरवर केली असल्याने सदरील पाईप हे बोगस असून सदरील पाईप हे अनेक ठिकाणी उघड्यावर पहावयास मिळाले असल्याने या रोडवर अनेक नागरिकांचे नळ कनेक्शन तुटले असून त्याला दुरुस्त करून देण्याची मागणी नागरिकांनी केली असता सदरील गुत्तेदार दमबाजी करून साइडवर असलेल्या रोड रोलर अंगावर घालत आहे.त्यामुळे नागरिकांनी स्वखर्चातून तोडलेले नळ कनेक्शन हजार ते बाराशे रुपये रक्कम भरून दुरुस्त करून घेतले.सदरील नुकसान भरपाई व निकृष्ट दर्जाची पाईप लाईन काढून नवीन पाईपलाइन सदरील गुतेदारकडून करून घेण्याची मागणी अशोकराव पाटील निलंगेकर यांनी केली असून जोपर्यंत वरिष्ठ अधिकारी यांनी येऊन पाहणी करीत नाहीत तोपर्यंत पुढील काम करू देणार नाही,असे जर बोगस कामे होत असतील तर ते तात्काळ बंद करावे अन्यथा आम्हला लोकशाहीच्या मार्गाने करावे लागेल असा इशारा त्यांनी दिला.यावेळी माजी नगराध्यक्ष हमीद शेख,अशोकराव पाटील मित्र मंडळाचे जिल्हाध्यक्ष दयानंद चोपणे,निलंगा विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमोल सोनकांबळे,शहराध्यक्ष मुजीब सौदागर,माजी सभापती अजित माने,काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित नाईकवाडे,जावेद शेख,तकदीस फारुखि,शिवसेना शहरप्रमुख सुनील नाईकवाडे,अजय कांबळे,जमील शेख,सतीश फत्ते, तसेच शिवाजीनगर हाडगा नाका येथील असंख्य नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.