• Mon. Apr 28th, 2025

‘तो’ होता लातूरचा कलेक्टर, पवारांनी किल्लारीच्या आठवणी जागवल्या!

Byjantaadmin

Sep 30, 2023

लातूर : सगळं नुकसान होते., निसर्गाची अवकृपा झाली होती. प्रेतं पडली होती. पुढील तीन तासात सर्व वरिष्ठ अधिकारी डॉक्टर बोलावले आणि पुनर्वसन प्रक्रिया सुरू झाली. जवळपास 15 दिवस मी येथे राहिलो. दोन्हीं जिल्ह्यात जाऊन सकाळपासून आढावा घेत राहायचो. संकट मोठं होत परंतु या दोन्ही तालुक्यातील लोकांनी धैर्याने संकटाला तोंड दिले, असे म्हणत  भूकंपात मृत्यू पावलेल्यांना (Sharad Pawar) यांनी श्रद्धांजली वाहिली. किल्लारी भूकंपाला आज 30  वर्षं पूर्ण झाली कृतज्ञता सोहळ्यात भुकंपग्रस्त करणार शरद पवारांचा सत्कार करण्यात आला. या वेळी ते बोलत होते.  पवारांनी त्यावेळची परिस्थिती सांगितली.

शरद पवार म्हणाले, आजचा दिवस अस्वस्थ करणारा दिवस आहे. गृहमंत्र्यांना अनेक कामे असतात त्यातील एक काम म्हणजे शेवटचा मोठ्या गणपतीचं विसर्जन होतं नाही तोपर्यंत लक्ष ठेवून असतात. त्यावेळी परभणीमध्ये विसर्जन होतं नव्हतं काही अडचण आहे का? अशी माहिती मी परभणी एसपीकडून घेतली. 4 वाजता मी झोपायला जात होतो त्यावेळी भूकंप झाला. कारण घरातली सगळं सामान हलले होते. मी पहिला फोन पाटणला लावला आणि तिथं भूकंप झाला आहे का ते मला नाही म्हणाले. मग मी आणखी माहिती घेतली तर मला माहिती मिळाली लातुर जिल्ह्यातील किल्लारी येथे भूकंप झाला होता. सकाळी 6 वाजता मी थेट किल्लारीला आलो. त्यावेळी लक्षात आलं की, येथे किल्लारी गाव नाहीच. सगळं नुकसान झालं आहे. निसर्गाची अवकृपा झाली होती. प्रेतं पडली होती. मी पुढील तीन तासात सर्व वरिष्ठ अधिकारी डॉक्टर बोलावले आणि पुनर्वसन प्रक्रिया सुरू झाली. जवळपास 15 दिवस मी इथ राहिलो. दोन्ही जिल्ह्यात जाऊन सकाळी 7 पासून आढावा घेत राहायचं. संकट मोठं होत परंतु या दोन्ही तालुक्यातील लोकांनी धैर्याने संकटाला तोंड दिलं.

पंतप्रधानांना म्हणालो लातूरला यायचं नाही…

शरद पवार म्हणाले,  पद्मसिंह पाटील विलास देशमुख यांच्यावर जवाबदारी सोपवली त्यावेळी प्रविण परदेशी नावाचे कलेक्टर होतें. मी अडीच तीन वाजता निघालो होतो रात्रीची वेळ होती त्यावेळी एक बैलगाडी दिसली. त्यात एकजण झोपला होता मला वाटल याचं नुकसान झालं आहे. मी म्हटल याच नुकसान झालं आहे याला भेटले पाहिजे मी थेट त्याला उठवलं तर तो इथला कलेक्टर प्रवीण परदेशी होता. त्यावेळी किल्लारी सावरायला पैसै नव्हते मी अर्थमंत्रीनमोहन सिंह यांना अडचण सांगितली. त्यांनी कोट्यवधी रक्कम 10 दिवसांत उपलब्ध करुन दिली. देशाचे पंतप्रधान तीन दिवसांत येणार होते मी सांगितलं यायचं नाही कारण ते आले तर सगळे अधिकारी त्यात अडकतील आणि जखमी लोकांकडे दुर्लक्ष होईल. त्यांनी ऐकलं आणि ते आले नाहीत.

देशात आपत्ती निवारण यंत्रणेचा उगम किल्लारीला

आपत्ती निवारण यंत्रणा आपल्याकडे नव्हती  त्यावेळी प्रामुख्यानं हा विषय मांडला आणि त्यानंतर मला त्याची जबाबदारी माझ्यावर देण्यात आली. सोनिया गांधी यांनी माझ्यावर ती जबाबदारी सोपवली. मी दोन वर्ष काम केलं आणि देशात आपत्ती निवारण यंत्रणा उभारली. याचा उगम किल्लारी येथून झाला आहे. अनेक कुटुंबातील प्रमुख माणसं गेली होती त्यावेळी शांतीलाल मुथा यांच्यावर एक जबाबदरी दिली.  त्यांनी पुण्यात एक इमारत बांधून त्याठिकाणी इथल्या मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था केली. घरचे पालक नसले तरी शांतीलाल मुथा हे त्यांचे पालक झाले. आजचा कार्यक्रम माहिती नव्हता. कृतज्ञता व्यक्त करण्याची आवश्यकता नव्हती परंतु हे संस्कार यशवंतराव चव्हाण यांची आहे. साडे आठ हजार नागरिकांचा येथ मृत्यू झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed