शेतकरी हितासाठी लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक यापुढे देखील गतिमान पद्धतीने कार्यरत ठेवू
राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांचे प्रतिपादन
जिल्हा बँकेला ११० कोटी रुपयांचा ढोबळ नफा
जिल्हा बँकेच्या कर्मचारी व गट सचिवांना २२% दिवाळी बोनस जाहीर
लातूर :-शेतकरी सभासदांच्या हिताला प्राधान्य देत मागील ४० वर्षापासून कार्यरत असलेली लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यापुढे देखील गतिमान पद्धतीने कार्यरत ठेवू असे प्रतिपादन राज्याचे माजी मंत्री तथा जिल्हा बँकेचे मार्गदर्शक सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख यांनी केले. ते लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ४० व्या वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी पार पडली त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी बँकेचे चेअरमन आमदार धिरज विलासराव देशमुख हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार वैजनाथ शिंदे, माजी आमदार अँड त्र्यंबक भिसे राज्य साखर संघाचे संचालक आबासाहेब पाटील, जिल्हा बँकेचे व्हाईस चेअरमन प्रमोद जाधव,जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल उटगे,माजी चेअरमन यशवंत पाटील, जेष्ठ संचालक अँड श्रीपतराव काकडे,जेष्ठ संचालक अशोकराव पाटील निलंगेकर, रेणाचे चेअरमन सर्जेराव मोरे, व्हॉईस चेअरमन अनंतराव देशमुख संत शिरोमणीचे चेअरमन गणपतराव बाजूळगे, व्हाइस चेअरमन श्याम भोसले, अशोक गोविंदपुरकर, बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे, उपसभापती सुनील पडीले,शीलाताई पाटील, विद्याताई पाटील, विजय देशमुख, रवींद्र काळे, गणेश देशमुख,जिल्हा बँकेचे संचालक पृथ्वीराज शिरसाठ, एन आर पाटील, व्यंकटराव बिरादार, अँड राजकुमार पाटील, भगवानराव पाटील तळेगावकर, जयेश माने दिलीप पाटील नागराळकर, मारोती पांडे, अनुप शेळके,संचालिका सौ स्वयं प्रभा पाटील, सौ सपना कीसवे, सौ अनिता केंद्रे, सुनिल कोचेटा बँकेचे कार्यकारी संचालक एच. जे. जाधव, रेणाचे कार्यकारी संचालक बी.व्ही.मोरे, विलास कारखान्याचे कार्यकारी संचालक संजीव देसाई, जागृतीचे शुगरचे सरव्यवस्थापक गणेश येवले, शिरोमणीचे प्रभारी कार्यकारी संचालक रविशंकर बरमदे,विविध संस्थांचे पदाधिकारी, आदींची प्रमुख उपस्थिती होती.
*भविष्यात शेतकऱ्यांना घर बांधणी व सोलार पंपासाठी कर्ज देण्याचा विचार करू*
*माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचे प्रतिपादन*
यावेळी बोलताना माजी मंत्री दिलीपराव देशमुख म्हणाले की मराठवाड्यातील मागासले पण दूर करण्याच्या कामात लातूर जिल्ह्यातील इतर संस्था सह जिल्हा बँकेने अग्रेसर भूमिका घेतली आहे. शेतकऱ्यांना वेळेवर कर्जाची उपलब्धता करून आर्थिक परिवर्तनासाठी लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने गतिमान कारभार केला असून भविष्यात शेतकरी सभासदांना घर बांधणीसाठी व सोलार पंपासाठी कर्ज देण्याच्या दृष्टीने बँक विचार करत असल्याचे सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख यांनी सांगितले.तसेच जिल्हा बँकेतील कर्मचाऱ्यांना व गटसचिवांना 22 % बोनस देणार असल्याचे सांगून कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या असल्याचे त्यांनी जाहीर केले.
*जिल्हा बँक अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणार*
*चेअरमन आमदार धीरज देशमुख यांचे प्रतिपादन*
यावेळी बोलताना लातूर जिल्हा बँकेचे चेअरमन आमदार धिरज विलासराव देशमुख म्हणाले की, अनुभवी संचालक मंडळाच्या सहकार्याने शेतकरी हिताच्या योजना राबवत असताना गरजे प्रमाणे शेतकऱ्यांना वेळोवेळी कर्ज उपलब्ध करून बँकेने कर्तव्याची पूर्तता केली आहे.
हे कार्य यापुढे देखील सुरू राहणार असून लातूर जिल्हा बँक अधिक सक्षम कशी होईल यासाठी प्रयत्न करत असताना योग्य आर्थिक नियोजनाच्या माध्यमातून यशाचा आलेख कायम ठेवू असा शब्द त्यांनी देत बँकेचा ढोबळ नफा ११० कोटी, वसुली १००% टक्के निव्वळ एन पी ए ०% तर बँकेचा व्यवसाय ७५०० कोटी रुपयांचा असल्याचे बँकेचे अध्यक्ष आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी सांगितले
यावेळी बँकेच्या नव्या लोगोचे अनावरण सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख यांच्या हस्ते करून एकाच वेळी ऑनलाइन पद्धतीने सभासदांना त्यांच्या खात्यावर लाभांश पाठवण्याचा शुभारंभ यावेळी करण्यात आला.
याप्रसंगी बँकेचे जेष्ठ संचालक अशोकराव पाटील निलंगेकर, अशोक गोविंदपुरकर यांची भाषणे झाली.
जिल्हा बँकेचे व्हाईस चेअरमन प्रमोद जाधव यांनी प्रास्ताविकात बँकेच्या कार्याचा आढावा सभासदांसमोर मांडला. कार्यकारी संचालक एच. जे. जाधव यांनी सभेसमोरील सर्व विषयांचे वाचन केले, त्यास संचालकांनी अनुमोदन दिले व उपस्थित सर्व सभासदांनी टाळ्यांच्या गजरात सर्व विषयांना मंजुरी दिली.
जिल्हा बँकेच्या यशस्वी कारकीर्दीत योगदान दिलेल्या मान्यवरांचा सन्मान
या सर्वसाधारण सभेत यशस्वी शेतकरी, उच्च शिक्षणासाठी कर्ज घेतलेल्या विद्यार्थि तसेच जिल्हा बँकेच्या आजपर्यंतच्या वाटचालीत योगदान दिलेल्या सर्व माजी चेअरमन यांचा यथोचित सत्कार करून त्यांच्या योगदाना बद्दल आभार व्यक्त करण्यात आले याप्रसंगी शेतकरी सभासद, सोसायटी सदस्य, चेअरमन मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वसाधारण सभेचे
सूत्रसंचालन सचिन सूर्यवंशी यांनी केले तर आभार बँकेचे संचालक पृथ्वीराज शिरसाठ यांनी मानले.