निलंगा तालुक्यातील १०० टक्के वसुली केलेल्या 83 संस्थांचा जिल्हा बँकेच्या वतीने सत्कार
निलंगा :-निलंगा य़ेथील जिल्हा बॅंकेच्या सभागृहात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने निलंगा तालुक्यातील वि,का, ८३ संस्थांच्या चेअरमन व गटसचीव यांचा सत्कार आयोजीत करण्यात आला होता. जिल्हा बॅंकेचे संचालक अशोकराव पाटील निलंगेकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील शंभर टक्के वसुली केल्याबद्दल संस्थेचे चेअरमन व गटसचीव यांचा सत्कार करण्यात आला.
निलंगा तालुक्यात 100 विविध कार्यकारी सोसायटी असून, यातील 83 सोसायटींनी बॅंक स्तरावर शंभर टक्के वसुली केली आहे. तर 6 वि.का. संस्थांची संस्था सतरावर 100 टक्के वसुली झालेली आहे. त्यामुळे लातूर जिल्हा बँकेच्या वतीने उत्कृष्ट कार्य करणाऱ्या या सोसायटींच्या पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला.
या वेळी प्रमुख पाहुणे म्हणुन प्रा. राजेंद्र सुर्यवंशी चेअरमन दुध संघ, मोहनराव भंडारे, माजी उपसरपंच औराद, तसेच आजीत माने माजी सभापती पंचायत समिती निलंगा व जिल्हा बॅंकेचे माजी वसुली व्यवस्थापक श्री व्ही.जी.शिंदे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थीती होती.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन तालुका फिल्ड आफिसर श्री संजय माने व श्री बालाजी वाडकर यांनी केले. तर आभार प्रदर्शन श्री दीपक हल्लाळे यांनी केले.
या वेळी तालुक्यातील सर्व वि,का, संस्थांचे चेअरमन व गटसचीव, जिल्हा बॅंकेचे तपासणीस व कर्मचारी आदी मोठ्या संख्येने हजर होते. या कार्यक्रमासाठी तालुका फिल्ड आफिसर श्री संजय माने यांच्यासह सर्व कर्मचा-याचे योगदान लाभले.