आर्थिक शिस्तीचे पालन करून रेणा कारखाना शेतक-यांच्या विश्वासास पात्र.
रेणा साखर कारखाना लवकरच सोलार व सि एन जी गॅस प्रकल्प उभारणी करणार -माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख यांचे प्रतिपादन
रेणा साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न
लातूर :-राज्यातील साखर कारखानदारीत अल्पावधीतच रेणा साखर कारखान्याने राज्यात आपली वेगळी ओळख निर्माण केली असून नियोजनबद्ध व्यवस्थापन व आर्थिक शिस्त पाळल्यामुळेच रेणा कारखाना शेतकरी सभासदांच्या विश्वासास पात्र राहिला आहे कारखान्याने बदलत्या काळानुसार वेगवेगळे प्रयोग करत नविन तंत्रज्ञान आत्मसात केले असून रेणा साखर कारखाना लवकरच सोलार व सी एन जी प्रकल्पाची उभारणी करनार असल्याचे प्रतिपादन रेणाचे साखर कारखान्याचे संस्थापक तथा राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख यांनी येथे बोलताना केले. ते रेणा सहकारी साखर कारखान्याची बुधवारी २१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजीत करण्यात आली होती त्यावेळीं ते बोलत होते.
यावेळी सर्वसाधारण सभेच्या व्यासपीठावर लातूर ग्रामीणचे आमदार तथा जिल्हा बँकेचे चेअरमन धिरज विलासरावजी देशमुख, माजी आमदार त्र्यंबक भिसे, राज्य साखर संघाचे संचालक आबासाहेब पाटील, रेणाचे माजी चेअरमन यशवंतराव पाटील, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष अँड श्रीपतराव काकडे, रेणा साखर कारखान्याचे चेअरमन सर्जेराव मोरे, लातूर बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे, उपसभापती सुनील पडिले, संत शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव बाजुळगे, व्हॉईस चेअरमन श्याम भोसले, जिल्हा बँकेचे व्हॉईस चेअरमन अँड प्रमोद जाधव, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल उटगे, ट्वेंटी वन शुगरचे उपाध्यक्ष विजय देशमुख, विलास कारखान्याचे उपाध्यक्ष रवींद्र काळे, रेणा साखर कारखान्याचे व्हॉईस चेअरमन अनंतराव देशमुख, रेणापुर बाजार समितीचे सभापती उमाकांत खलंग्रे, जिल्हा बँकेच्या संचालिका स्वयंप्रभा पाटील, सौ सपना कीसवे, इंदुताई इगे,
रेणाचे संचालक धनराज देशमुख, संग्राम माटेकर, प्रेमनाथ आकणगिरे, चंद्रकांत सूर्यवंशी, प्रवीण पाटील, संभाजी रेड्डी, शहाजी हाके, तानाजी कांबळे, संजय हरिदास,वैशालीताई माने, अमृताताई देशमुख, लालासाहेब चव्हाण,अनिल कुटवाड रेणा साखर कारखान्याचे
कार्यकारी संचालक बी. व्ही.मोरे,मांजराचे कार्यकारी संचालक पंडित देसाई, विलास कारखान्याचे कार्यकारी संचालक संजीव देसाई,विलास साखर कारखाना युनीट २ चे कार्यकारी संचालक श्री पवार
संत शिरोमणीचे प्र.कार्यकारी संचालक रविशंकर बरमदे, जागृतीचे सरव्यवस्थापक गणेश येवले आदींची प्रमुख उपस्थिती होती.
लोकनेते विलासराव देशमुख यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मांजरा साखर परिवारातील कारखान्याची वाटचाल सुरू
यावेळी पुढे बोलताना सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख म्हणाले की, लोकनेते विलासराव देशमुख यांनी विकासाचा जो मंत्र अंगीकारला तो आदर्श डोळ्यासमोर ठेवून रेणा व मांजरा परिवारातील सर्व कारखाने वाटचाल करत असुन रेणा साखर कारखाना कर्मचाऱ्यांना दिपावली निमित्ताने दहा(१०%) टक्के बोनस व सभासदांना दीपावली निमित्त प्रति सभासद ५० किलो साखर सवलतीच्या दरात देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
*लातूरच्या नेतृत्वानी सत्तेचा वापर जनतेच्या कल्याणासाठी*
*रेणा साखर ची वाटचाल यशस्वी*
यावेळी बोलताना लातूर ग्रामीणचे आमदार तथा जिल्हा बँकेचे चेअरमन धिरज विलासराव देशमुख म्हणाले की, मांजरा परिवारातील कारखान्याच्या सर्वसाधारण सभा एक प्रकारचा आनंद उत्सव असतो सभासदांचा विश्वास व नेतृत्वाचे विचार याचे आदान प्रदान या सभांमधून होत असते. हे वेगळेपण महाराष्ट्रातील साखर कारखानदारीत क्वचितच पाहायला मिळते. येथील नेतृत्वाने नेहमीच बेरजेचे राजकारण करून सर्वांना सोबत घेऊन चालण्याची भूमिका अंगीकारली, म्हणूनच मोठ्या दिमाखात लातूरच्या सहकार क्षेत्रातील कामाचे कौतुक राज्य व देशभरात होत असते. येथील नेतृत्वाने सत्तेचा वापर जनतेच्या सेवेसाठी केला असल्याचे सांगून रेणाच्या यशस्वी वाटचालीचा गौरव त्यांनी केला.
यावेळी रेणा साखर कारखान्याचे चेअरमन सर्जेराव मोरे यांनी मागील गळीत हंगामातील कारखान्याचा आढावा सर्वांसमोर सादर करून सहकार महर्षी दिलीपराव देशमुख, माजी मंत्री आ.अमितजी देशमुख व आ. धिरजजी देशमुख यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनाखाली भविष्यात देखील शेतकऱ्यांची सेवा करण्यासाठी रेणा साखर कारखाना कटिबद्ध आहे असे त्यांनी यावेळी मनोगतात सांगितले
यावेळी रेणा साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक बी.व्ही.मोरे यांनी विषय पत्रिकेवरील सर्व विषयांचे वाचन केले. त्यास व्हाइस चेअरमन अनंतराव देशमुख यांनी सर्व सभासद व संचालकाच्या वतीने अनुमोदन दिले व उपस्थित सर्व सभासदांनी टाळ्यांच्या गजरात सर्व विषयांना मंजुरी दिली.
याप्रसंगी सर्वसाधारण सभेत सर्वाधिक ऊस उत्पादक, सर्वाधिक ऊस तोडणी ठेकेदार, सर्वाधिक ऊस वाहतूकदार यांचा यथोचित सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला
यावेळी शेतकरी सभासद, विविध संस्थांचे पदाधिकारी, खाते प्रमुख, अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. सचिन सूर्यवंशी यांनी केले तर आभार संचालक प्रवीण पाटील यांनी व्यक्त केले