निलंगा ( प्रतिनिधी ) तालुक्यातील केळगाव येथील रहिवाशी जिल्हा परिषद शाळा तळीखेड येथील सहशिक्षक , शिक्षक काँग्रेसचे माजी निलंगा तालुकाध्यक्ष तथा निलंगा शिक्षक पतसंस्थेचे संचालक संजय लक्ष्मणराव चव्हाण यांचे आज दि 30 सप्टेंबर शनिवार रोजी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यू समयी ते 49 वर्षाचे होते . त्यांच्या पार्थिवावर मूळ गावी केळगाव येथे दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले . ते अत्यंत संयमी , शांत स्वभावाचे , प्रत्येकांच्या अडचणीत धावून येणारा एक मनमिळाऊ मित्र तथा सर्वसामान्य शिक्षकांचा कैवारी म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या पश्चात पत्नी , एक मुलगा , एक भाऊ असा परिवार आहे .