अशोकराव पाटील मित्र मंडळाच्या सिंदखेड शाखेचा उदघाटन सोहळा संपन्न
निलंगा- अशोकराव पाटील मित्र मंडळ शाखेचा उदघाटन समारंभ व नामफलकाचे अनावरण महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मा.श्री.अशोकराव पाटील निलंगेकर साहेब यांच्या हस्ते अशोकराव पाटील मित्र मंडळाचे जिल्हाध्यक्ष प्रा.दयानंद चोपणे,मानवाधिकार विधी काँग्रेस सेलचे ऍड.तिरुपती शिंदे,निलंगा विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमोल सोनकांबळे,निलंगा काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित नाईकवाडे,निलंगा अल्पसंख्याकचे तालुकाध्यक्ष लाला पटेल,निलंगा तालुका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष सोनाजी कदम,लहुजी शक्ती सेनेचे गोविंद सूर्यवंशी,नगरसेवक सुधीर लखनगावे यांच्या प्रमुख उपस्थितीत ढोलताशांच्या गजरात मोठया उत्साहात संपन्न झाला.यावेळी अशोकराव पाटील निलंगेकर म्हणाले की,सध्या मतदारसंघामध्ये शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून शेतकऱ्यांची व सामान्य माणसाची दयनीय परिस्थिती झाली असून आपले लोकप्रतिनिधी सरकार पक्षामध्ये असून शेतकऱ्यांला आर्थिक मदत करण्याऐवजी दिशाभूल करून मुख्य प्रश्नावर काम न करता या तालुक्यामध्ये आदरणीय निलंगेकर साहेबांनी सिंचनाचे जाळे निर्माण केले असताना जेव्हा विहिरीतच नाही तर पोहऱ्यात कुठून पाणी येणार जलसाक्षरता रॅली काढण्याऐवजी शेतकऱ्यांना आर्थिक मदत करा असे म्हणताना जे काही मंडळी राजकीय चर्चा करताना खालचा व वरचा वाडा एक आहेत असे म्हणणाऱ्यांना जोड्याने मारा असे आव्हान त्यांनी केले
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माणिक गुंडाजी बऱ्हाणपूरे ,अबरार देशमुख,सोशल मीडिया तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर वाडीकर, NSUI चे प्रसाद झरकर,अफसर पटेल,सोहेल शेख,भिकाजी बऱ्हाणपूरे,ज्ञानेश्वर जाधव,गोविंद सावळसुरे,पंढरी जाधव,कैलास कांबळे,ताहेर शेख,राजाराम सावळसुरे,वैजिनाथ सावलसुरे,दाऊद मन्सूर शेख,अनिल कांबळे,संदीप पनबोने,संदीप बंडे,सोहेल देशमुख,दत्तात्रय बऱ्हाणपूरे, इ कार्यकर्ते व गावातील मोठया संख्येने नागरिक उपस्थित होते