जागृती शुगर कारखान्यावर श्रींची प्रतिष्ठापना
लातूर – राज्यातील खाजगी साखर उद्योगात नावलौकिक असलेल्या लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील तळेगाव येथील जागृती शुगर कारखाना स्थळी जागृती कामगार गणेश मंडळाच्या वतीने श्रींची स्थापना करण्यात आली कारखाना स्थळी गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी वाजत गाजत ढोल ताशांच्या ताशाच्या गजरात कारखाना वसाहती पासून मिरवणूकिने श्रींचे आगमन झाले अधिकारी कर्मचारी कामगार यांनी गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया या घोषणेने कारखाना परिसर दणाणून सोडला कारखान्याचे सरव्यवस्थापक गणेश येवले यांच्या उपस्थितीत श्री व सौ संगापुडे यांच्या हस्ते श्रींची विधिवत पूजा करण्यात आली
राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी तथा कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याच्या अध्यक्षा सौ गौरवी अतुलजी भोसले (देशमुख) यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याचे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे यांच्या सूचनेनुसार दरवर्षी प्रमाणे याही वर्षी गणेश मंडळाची स्थापना करण्यात आली असून दरवर्षी प्रमाणे याही वर्षी श्रींची स्थापना करून विविध सामाजिक उपक्रम राबवन्यात येत असून विद्युत रोषणाई करण्यात आली आहे
श्रींच्या स्थापन सोहळ्याला कारखान्याचे जनरल मॅनेजर गणेश येवले, डीस्टलरी इन्चार्ज व्ही डी पाटील, एस जी उपासे, एस एस चव्हान, जी एन घोगरे, एस आर देशमुख, एस व्ही पालकर, एस शेळके, जे एस शिंदे, आर एम कांबळे, एम एस डोंगरे, एस एम पवार, आर एच जाधव,यांच्यासह अधिकारि कर्मचारी कामगार गणेश मंडळाचे पदाधिकारी महिला ,पुरुष, युवक, युवती मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते