• Tue. Apr 29th, 2025

जलसाक्षरता रॅलीचा निलंग्यातून शुभारंभ ; निळकंठेश्वराच्या दर्शन घेऊन दुचाकीस्वार होणार मार्गस्थ

Byjantaadmin

Sep 18, 2023

जलसाक्षरता रॅलीचा आज निलंग्यातून शुभारंभ
निळकंठेश्वराच्या दर्शन घेऊन दुचाकीस्वार होणार मार्गस्थ
निलंगा/प्रतिनिधीः- लातूर जिल्ह्याला हक्काचे पाणी मिळावे या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी जनजागर मंचच्या वतीने जिल्ह्यात जलसाक्षरता रॅली काढण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सार्वजनिक गणेश मंडळांसह नागरीकांचा पाठिंबा मिळविण्यासाठी ही रॅली संपुर्ण जिल्ह्यात फिरणार असून आज दि. 19 सप्टेंबर रोजी सकाळी निलंगा येथून या रॅलीचा शुभारंभ होणार आहे. निलंग्याचे ग्रामदैवत निळकंठेश्वराचे दर्शन घेऊन माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वात 500 दुचाकी या रॅलीसाठी मार्गस्थ होणार आहेत. दि. 19 सप्टेंबर पासून निघालेली ही जलसाक्षरता रॅली दि. 26 सप्टेंबर रोजी या रॅलीचे लातूर शहरात आगमन होऊन येथेच या रॅलीची सांगता होणार आहे.
माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वात निघणारी ही जलसाक्षरता रॅली निलंग्याचे ग्रामदैव श्री निळकंठेश्वराचे दर्शन घेऊन तालुक्यातील माकणी थोर येथे सकाळी 11 वा. पोहचणार आहे. या ठिकाणी नवसाला पावणार्‍या हनुमानाचे दर्शन घेऊन या ठिकाणी आ. निलंगेकर गणेश मंडळाच्या पदाधिकार्‍यासोबत संवाद साधणार आहेत. माकणी (थोर) येथून दूपारी 12 वा. हलगरा, दुपारी 1 वा. अंबुलगा, दुपारी 2.20 मि. केळगाव, दुपारी 4 वा. निटूर, दुपारी 5 वा. पानचिंचोली, सध्याकाळी 6 वा. कोतल शिवणी, संध्याकाळी 7 वा. हाडगा तर रात्री 8 वा. निलंगा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात या रॅलीचे आगमन झाल्यानंतर याठिकाणी महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 19 रोजी रॅलीचा मुक्काम निलंगा येथे राहणार असून दि. 20 रोजी सकाळी 8 वा. निलंगा शहरातून रॅली पुन्हा एकदा निलंगा तालुक्यातील नंणदकडे मार्गस्थ होणार आहे. सकाळी 8.30 वा. नंणद येथे संवाद साधल्यानंतर मदनसूरी 9.30 वा., मुदगड एकोजी येथे सकाळी 10.30 वा., कासारशिरसी येथे सकाळी 11.30 वा., दुपारी 2.30 वा. कासार बालकुंदा, दुपारी 3.30 वा. ताडमुगळी मोड, दुपारी 4.30 वा. औराद शहाजानी, सायंकाळी 6 वा. सावरी येथून पुन्हा एकदा ही रॅली मुक्कामी निलंगा येथे पोहचणार आहे.
दि. 21 रोजी निलंगा येथून सकाळी 8 वा. रॅली निघून शिरुर अनंतपाळ तालुक्यातील उजेड येथे 9 वा. पोहचणार असून यानंतर सकाळी 10 वा. शिरुर अनंतपाळ, सकाळी 11 वा. येरोळ, दुपारी 12.30 वा. साकोळ येथून ही रॅली देवणी तालुक्यातील जवळगा येथे दु.1.30 वा. पोहचणार आहे. यानंतर वलांडी येथे दु. 3 वा., देवणी दु. 4 वा. मोघा येथे संध्याकाळी 6 वा. ही रॅली संवाद साधून उदगीर येथे मुक्कामी पोहचणार आहे. दि. 22 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वा. उदगीर शहरात जलसाक्षरता फेरी काढून माजी मंत्री आ. निलंगेकर यावेळी गणेश मंडळाचे पदाधिकारी व शहरातील नागरीकासोबत संवाद साधणार आहेत. उदगीर येथून सकाळी 11 वा. पिंपरी, दु. 12 वा. नळगीर, दु. 1 वा. घोणसी, दु. 2.30 वा. कौळनूर चौक, दु. 3.30 वा. पोटोदा, दु. 4.30 वा. जळकोट, संध्याकाळी 5.30 वा. हाडोळती, संध्याकाळी 6 वा. शिरुर ताजंबद येथून ही रॅली अहमदपूर येथे मुक्कामी पोहचणार आहे. दि. 23 सप्टेंबर रोजी माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वातील ही साक्षरता रॅली सकाळी 9 वा. अहमदपूर शहरात फेरी काढून गणेश मंडळाचे पदाधिकारी व अहमदपूर शहरातील नागरीकांशी संवाद साधून जलसाक्षतेचे धडे देणार आहे. अहमदपूर येथून निघालेली ही रॅली सकाळी 11 वा. चापोली, दु. 12 वा. चाकूर, दु. 1 वा. घरणी, दु. 2.30 वा. आष्टा मोड, दु. 3 वा. रेणापूर तालुक्यातील खरोळा ही रॅली पोहचेल त्यानंतर दु. 4.30 वा. रेणापूरात संवाद साधून ही रॅली संध्याकाळी 5.30 वा. लातूर शहरात पोहचणार असून शहरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकात या रॅलीचे स्वागत होणार आहे. दि. 23 सप्टेंबर रोजी या रॅलीचा मुक्काम लातूर येथे राहणार आहे.
लातूर येथून दि. 24 सप्टेंबर रोजी ही रॅली सकाळी 8 वा. मार्गस्थ होणार असून सकाळी 9 वा. औसा तालुक्यातील बुधडा येथे पोहचणार आहे. यानंतर हासेगाव येथे सकाळी 10 वा., दु. 12 वा. लामजना पाटी, दु. 1 वा. किल्लारी, दु. 3 वा. लामजना, दु. 3.30 वा. तपसेचिंचोली, दु. 4.30 वा. नागरसोगा येथे पोहचणार आहे. यानंतर संध्याकाळी 5.30 वा. औसा शहरात आगमन होणार असून याठिकाणी महाआरती करून गणेश मंडळाचे पदाधिकारी व औसेकरांशी माजी मंत्री आ. निलंगेकर संवाद साधणार आहेत. औसा येथून पुन्हा ही रॅली लातूर येथे मुक्कामी येणार आहे. दि. 25 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वा. लातूर येथून ही रॅली लातूर तालुक्यातील गंगापूरकडे मार्गस्थ होणार आहे. सकाळी 9 वा.गंगापूर, सकाळी 10 वा. एकुर्गा, सकाळी 11.30 वा. निवळी, दु. 12.30 वा. मुरुड, दु. 2 वा. बोरगाव (काळे), दु. 3.30 शिराळा, दु. 4.30 वा. गाधवड, दु. 4.50 वा. काटगाव तर संध्याकाळी 6 वा. भोईसमुद्रा येथे ही रॅली गणेश मंडळाचे पदाधिकारी व नागरीकांशी संवाद साधून पुन्हा एकदा लातूर येथे मुक्कमी येणार आहे.
दि. 26 सप्टेंबर रोजी लातूर शहरता दिवसभर ही रॅली गणेश मंडळाचे पदाधिकारी व नागरीकांशी संवाद साधणार असून याच दिवशी संध्याकाळी रॅलीची सांगता होणार आहे. दि. 19 ते 26 सप्टेंबर दरम्यान माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वातील ही जलसाक्षरता रॅली वरील ठिकाणी जिल्ह्यातील सध्याची व भविष्यातील पाण्याच्या स्थितीबाबत माहिती देऊन आपल्या हक्काच्या पाण्यासाठी शासन दरबारी आवाज पोहचविण्याकरीता गणेश मंडळासह नागरीकांचा पाठिंबा मिळविण्याकरीता संवाद साधणार आहे. या रॅलीत 500 दुचाकींवर माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांच्यासह हजार युवक सहभाग घेणार आहेत. त्याचबरोबर ज्या-ज्या ठिकाणी ही रॅली जाणार आहे. त्या-त्या ठिकाणचेही दुचाकीस्वार या रॅलीत सहभाग नोंदविणार आहेत. या रॅलीत जिल्ह्याच्या उज्वल भविष्यासाठी अधिकाधिक जणांनी सहभाग घ्यावा असे आवाहन जनजागर मंचच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed